यंदा पावसाचा अंदाज सांगणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित संस्थांनी विसंगत हवामान अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी गोंधळले आहेत. दरम्यान अजून राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊसही झालेला नाही. दरम्यान, राज्य सरकारनेही खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे यंदा खरीप पेरण्या लांबण्याची चिन्हे दिसत असून, त्या जुलै-ऑगस्टपर्यंत रेंगाळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मोठी घोषणा : बोगस बियाणे विकणाऱ्यांला 10 वर्षांची शिक्षा ; नवा कायदा करणार : कृषीमंत्री
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मान्सून राज्यात दाखल झाल्याचे व येत्या 48 तासात महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे स्कायमेटने मात्र सध्याचे बिपोरजॉय चक्रीवादळ विसर्जित होईपर्यंत मान्सून कमजोर राहण्याचा अंदाज जाहीर केले आहे. चक्रीवादळाच्या जोडीलाच एल-निनोचे सावट यंदाही असणार आहे. हे सारे पाहता, अनियमित मान्सूनमुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये, आता पाऊस पडला तरी जुलैपर्यंत धीर धरावा, असा सबुरीचा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वीच कृषी विभागाने पेरणीला जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पावसाची तीव्रता पडताळून पाहण्याचा सल्ला दिला आहे. यंदा ऑगस्टपर्यंत खरीप पेरण्या सुरू रहातील या अंदाजाने राज्य सरकारचे नियोजन सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जुलैपर्यंत वाट पाहावी, असे सांगण्यात आले आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करून शेतकऱ्यांना स्पष्टपणे हा इशारा दिला आहे. पावसाची तीव्रता पडताळून न पाहता पेरणी केल्यास बियाणे उगवण होऊ शकत नाही. आपल्या परिसरात किमान 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पिकांची पेरणी सुरू करावी, असे सांगण्यात आले आहे.
लक्षवेधी पीक : अशी आहे अननस शेतीची व्यवस्थापन पद्धत
दरवर्षी साधारणपणे 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात म्हणजे कोकण-मुंबईत येतो. हळूहळू सर्व 36 जिल्ह्यांमध्ये मान्सून तीव्र होतो आणि पेरणीचा हंगाम जूनच्या मध्यात सुरू होतो. मात्र, यंदा मान्सून लांबला आहे. सध्या मान्सून तळकोकणात आला असला तरी चक्रीवादळामुळे त्याची सक्रियता कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेतकरी मान्सूनचा पहिल्या पाऊस पडल्यानंतर लगेचच खरीप पेरणी सुरू करतात. हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण, सुरुवातीच्या अल्प पावसानंतर पुढील पावसाने दीर्घ काळासाठी उघडीप दिल्यास पेरलेले बियाणे उगवत नाही किंवा पिकांची सुरुवातीची वाढ खुंटते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. त्यामुळे राज्य सरकारच्या सूचनेनुसार तालुका अधिकारी आणि कृषी केंद्रांसह जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना नियमित अलर्ट जारी करत आहे.
राज्यात कोकण पट्ट्याच्या तुलनेत, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाचा काही भाग हा दुष्काळी भाग आहे. त्यात एल-निनोमुळे चिंता आणखी वाढवली आहे. सरकार आणि हवामान तज्ञांना भीती आहे, की एल-निनोमुळे उद्भवणारी हवामानाची स्थिती राज्यातील मान्सून आणखी कमकुवत करू शकेल. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी सरकार कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापणार
https://www.facebook.com/shetimitramagazine03