मान्सून लांबल्याने राज्यात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. सध्य स्थितीला मराठवाड्यातील धरणाचा पाणीसाठा बुडाला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याबरोबरच सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान मराठवाड्यातील धरणाचा पाणीसाठा बुडाला गेला असून, ऐन पावसाळ्यात मराठवाड्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चिंताजनक : राज्यात केवळ 5.5 मिमी पावसाची नोंद
जून महिना सरत आला तरी मान्सूनच्या पावसाने दडी मारली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला असून पावसाला उशीर होण्याचा अंदाज आहे. पावसाआभावी खरीपाच्या पेरण्याही लांबल्या आहेत. अशातच मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठाही खोल गेल्याने शेतकरी आणि उद्योगांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये यंदा आत्तापर्यंत केवळ 13.2 मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 36.02 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणात 30.14 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर निम्न दुधना धरणात 27.39 टक्के, येलदरी धरणात 56.57 टक्के, माजलगाव धरणात 21.09 टक्के, मांजरा धरणात 21.62 टक्के, पैनगंगा धरणात 45.17 टक्के, मानार धरणात 35.59 टक्के, निम्न तेरणा धरणात 32.12 टक्के, विष्णुपुरी धरणात 45.87 टक्के तर सिना कोळेगाव धरणात 02.03 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सिद्धेश्वर धरण कोरडे पडले आहे.
ब्रेकिंग न्यूज : मान्सून जैसे थे ; बिपरजॉयचा धिंगाणा
बिपरजॉय चक्रीवादळ आणि अल निनोच्या परिणामांमुळे मान्सूनच्या आगमनाला थेट फटका बसल्याने जूनच्या सुरुवातीला पेरणीची तयारी सुरू करणारे शेतकरी यंदा चिंतेत आहेत. राज्यात नऊ जूनपर्यंत सरासरीच्या केवळ 8.8 टक्के पाऊस पडला आहे. परिणामी खरिपाची पेरणी रखडली आहे. राज्यातील खरीप पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी अवघ्या एक टक्का म्हणजे 0.77 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केल्याची माहिती हाती आली आहे.
ब्रेकिंग : यंदा खरीप पेरण्या लांबणार ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03