मान्सूनची प्रतिक्षा असलेल्या शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच आनंदाची बातमी असून, आता 23 जूनपासून मान्सूनचा पाऊस राज्यात सक्रीय होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील खोळंबलेल्या खरीप पेरण्यांना वेग येणार आहे.
ब्रेकिंग : मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा बुडाला
यंदा मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये डेरेदाखल झाला होता. त्यानंतर साधारणतः 7 जूनपर्यंत तळकोकणात येणारा मान्सून यंदा चार दिवस उशिराने दाखल झाला. त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती थांबली.
हवामान विभागाने मान्सून 15 जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज बिपरजॉय चक्रीवादळामुळे फोल ठरवला आहे. आता 23 जूनपासून मान्सून महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या सर्वजण पावसाची वाट बघत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. सध्या मान्सून कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. हवामान विभागाने येत्या चार आठवडय़ांचा पावसाचा विस्तारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार 23 जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात मान्सून पाऊस सुरू होण्यास पोषक वातावरण तयार होईल. राजस्थानवगळता देशाच्या अन्य भागांत मान्सून पाऊस 23 जूननंतर सक्रिय होईल, असेही हवामान विभागाने म्हणाले आहे.
चिंताजनक : राज्यात केवळ 5.5 मिमी पावसाची नोंद
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून, 16 ते 22 जून या काळात ईशान्य भारत, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागात दाखल होईल. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मान्सून गुजरात आणि राजस्थानच्या बहुतांश भागात पोहोचणार आहे. 23 ते 29 जून या काळात मान्सून राजस्थानवगळता पूर्ण देशात दाखल होऊन देशाच्या बहुतांश भागांत पाऊस सुरू होईल. 30 जून ते 6 जुलै या आठवडय़ात देशात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. 7 ते 13 जुलै या काळातही देशात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली दिली.
ब्रेकिंग न्यूज : मान्सून जैसे थे ; बिपरजॉयचा धिंगाणा
https://www.facebook.com/shetimitramagazine03