राज्यातील तापमानात पार म्हणावा असा कमी झालेला नाही. विदर्भातील कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. भारतीय हवामान विभागाने आज बुधवारी (दि.20) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मोठी बातमी : पीएम किसानच्या कार्यपद्धतीत बदल : कृषी व महसूलमध्ये कामाचे वाटप
पूर्वमोसमी पावसाने मारलेली दडी आणि लांबलेल्या मान्सून यामुळे राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्याच्या कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच असून, जोरदार वारे वाहत आहेत. काही भागात ढगाळ हवामानामुळे धगाटा वाढला आहे.
सोमवारी (दि.19) सकाळपर्यंतच्या 24 तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 42.4 अंश सेल्सिअस, तर गडचिरोली येथे 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात तापमान 32 ते 41 अंशाच्या दरम्यान होते. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे.
मान्सून अपडेट्स : 23 जूनपासून मान्सून सक्रीय होणार
सोमवारी (दि.19) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)
पुणे 34.1 (23.9), जळगाव 39 (27), धुळे 39 (23.2), कोल्हापूर 32.7 (23.8), महाबळेश्वर (18.1), नाशिक 32.9 (23.9), निफाड 34.5 (25), सांगली 34.9 (23.7), सातारा 33.3 (23.4), सोलापूर 38.4 (24.8), सांताक्रूझ 32.6 (28.1), डहाणू 35.3 (28.5), रत्नागिरी 32.6 (28.1), छत्रपती संभाजीनगर 36 (22.6), नांदेड 39.8 (28), परभणी 38.1 (26.9), अकोला 40.1 (28.4), अमरावती 39.8 (26.3), बुलढाणा 38 (25), ब्रह्मपूरी 41.8 (30.4), चंद्रपूर 42.4 (30.4), गडचिरोली 42 (28.8), गोंदिया 40.8 (28.6), नागपूर 40.3 (28.6), वर्धा 40 (29.5), वाशीम 41 (24.6) यवतमाळ 39.5 (26) असे नोंदले गेले असून, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
ब्रेकिंग : मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा बुडाला
https://www.facebook.com/shetimitramagazine03