राज्यात मान्सून तर लांबलाच आहे बहुतांश भागात अद्याप पूर्व मोसमी पाऊसही झालेला नाही. त्यामुळे राज्यात सध्या चिंताग्रस्त स्थिती असून, त्यात भरीत भर म्हणजे पाणी टंचाईची तिव्रता वाढली आहे. सध्या राज्यात 547 गावे व 1404 वाड्यावस्त्यंवर पाणी पुरवठा करणारे 426 टँकर सुरू आहेत. पाऊस आजून लांबला तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग : आज विदर्भात उष्णतेची लाट : मराठवाड्यात तुरळक पाऊस
पावसाळा सुरू होऊन जवळपास वीस दिवस होत आले आहेत. तरीही राज्यात पावसाचे आगमन झालेले नाही. विशेष म्हणजे अजून काही भागात पूर्व मोसमी पाऊसही झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. लवकरात लवकर दमदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची तीव्रत अजून वाढण्याची शक्यता असून, पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत 591 गावात व 1312 वाड्यावर वस्त्यांवर 501 टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 75 टँकर कमी आहेत. मात्र यंदा पाणी टंचाईची तीव्रत लक्षात घेता टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या समस्येचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मोठी बातमी : पीएम किसानच्या कार्यपद्धतीत बदल : कृषी व महसूलमध्ये कामाचे वाटप
मागील काही वर्षांत मराठवाड्यात पाणी टंचाईची तीव्रता जास्त होती. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस होत असल्याने टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. यंदाही मराठवाड्यातील 36 गावे व 18 वाड्यावस्त्यांवर अवघ्या 49 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर औरंगाबाद, बीड, परभणी, लातूर उस्मानाबाद, लातूर भागात अजूनही टँकर सुरू झालेले नाहीत मात्र जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत 49 टँकर सुरू आहेत.
विदर्भातील अमरावती विभागात गेल्या वर्षी कमीअधिक पाऊस झाला होता. त्यामुळे या भागात पाणीटंचाई कमीअधिक असल्याने अमरावती विभागात 37 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. नागपूर विभागात अजूनही टँकर सुरू झालेले नाहीत.
मान्सून अपडेट्स : 23 जूनपासून मान्सून सक्रीय होणार
मध्य महाराष्ट्रातही गेल्या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, होणारा अधिक उपसा आणि उन्हाची वाढती तीव्रता यामुळे टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. नाशिक विभागातील 99 गावे व 172 वाड्या-वस्त्यांवर 102 टँकर, तर पुणे विभागातील 109 गावे व 444 वाड्यावस्त्यांवर 86 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. ठाणे विभागातील 270 गावे व 770 वाड्यावस्त्यांवर सर्वाधिक 152 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
सर्वसाधारण ठाणे जिल्ह्यात 46, रायगड जिल्ह्यात 47, रत्नागिरी जिल्ह्यात 20, पालघर जिल्ह्यात 39, नाशिक जिल्ह्यात 57, जळगाव जिल्ह्यात 29, नगर जिल्ह्यात 16, पुणे जिल्ह्यात 41, सातारा जिल्ह्यात 40, सांगली जिल्ह्यात 1, कोल्हापूर जिल्ह्यात 1, जालना 33, हिंगोली 12, नांदेड जिल्ह्यात 4, अमरावती जिल्ह्यात 13, वाशीम जिल्ह्यात 1, बुलडाणा जिल्ह्यात 19 तर यवतमाळ जिल्ह्यात 4 टँकरने पाणी पूरवठा सुरु आहे.
ब्रेकिंग : मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा बुडाला
https://www.facebook.com/shetimitramagazine03