एकाबाजूला पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ आणि दुसऱ्याबाजूला हिरव्या चाऱ्याची टंचाई यामुळे पशुपालक अक्षरशा वैतागला आहे. अशातच गाईच्या दुधदरात मोठी घसरण झाल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक झटका बासला आहे. 40 रुपयांपर्यंत गेलेले गाईच्या दुधाचे दर 32 वर आल्याने पशुपालका शेतकरी अडचणीत आले आहेत.
मोठी घोषणा : वारीतील वारकऱ्यांना विमा संरक्षण : मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतात. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र सध्या शेतीला जोडधंदा म्हणून केल्या जाणाऱ्या दुग्धव्यवसायातून आता शेतकऱ्यांना फायदा मिळेनासा झाला आहे. ज्याचे कारण म्हणजे आता दुधाचे दर कमी होत असून दुसऱ्या बाजूला पशुखाद्याच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे.
गेल्या दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर टप्याटप्याने कमी होताना दिसून येत आहेत. दोन महिन्यात दुधाचे हे दर 8 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वास्तविक उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होतो. परिणामी दुधाचे उत्पादनही घटते. मात्र दुधाच्या दरात वाढ होत असते. मात्र यंदा हे चक्र उलटे फिरले आणि दुधाच्या खरेदी दरात घट झाली.
ब्रेकिंग : यंदा अजब घडणार : मान्सून चंद्रपूरमार्गे येणार ?
गाईच्या दुधदरात मोठी घसरण झाली असली तरी म्हशीच्या दुधदरात झालेली नाही. मात्र पशुपालका शेतकऱ्यांकडे जर्सी दुभत्या गायींचे प्रमाण जास्त आहे. मागील काही दिवसांपासून दुधाचे दर वाढले होते. त्यामुळे पशुपालक दुग्ध व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत असतानाच ही दरातील घसरण झाली आहे. पाठोपाठ शेतकऱ्यांकडे उपलब्ध चारा संपुष्टात आल्याने ओला चारा ऊस, कडबा, मुरघास, मका, कडबा यांचे दरही भडकले आहेत. पाऊस लांबल्याने नैसर्गिक चाराही सध्या उपलब्ध नाही. पशुपालकांकडे उपलब्ध असणारा चारा संपला असून, पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी जादा भुर्दंड सोसावा लागत आहे.
दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत आता आक्रमक झाले आहेत. पशुपालका शेतकरी आता रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या तयारीत आहेत.