अखेर मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. त्याने गेल्या 24 तासात राज्यात चांगलीच मजल मारली आहे. राज्यात येत्या 5 दिवसांत सर्वत्र मान्सून दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
गुडन्यूज : मान्सून आला रे : मुंबईसह विदर्भात धोधो
चक्रीवादळ पुढे सरकल्याने मोकळा झालेला मार्ग व मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीला निर्माण झालेले पोषक वातारण, यामुळे आता रखडलेला मान्सूनने वेग घेतला आहे. काल पावसाने विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. तर आज पुण्यातही मान्सून जोरदार हजेरी लावली. पुढचे 5 दिवस राज्यात सर्वत्र मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

यंदा राज्यात मान्सूनच आगमन उशिराने झाले. त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला आहे. मात्र चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. शुक्रवारी विदर्भात मान्सूनचे आगमन झाले त्यानंतर आता आज मान्सून मुंबईसह पुण्यातही दाखल झाला आहे. पुढील पाच दिवसात विदर्भासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभगाने वर्तवली आहे.
मुंबईतील कुलाबा वेधशाळेकडून जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात बहुतांश भागात पुढच्या 5 दिवसांत मान्सून सक्रिय राहणार आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाचे : गायीच्या दूधदरात 8 रुपयांची घसरण
दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. तसेच येत्या 3 ते 4 दिवसात विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
मोठी घोषणा : वारीतील वारकऱ्यांना विमा संरक्षण : मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

https://www.facebook.com/shetimitramagazine03