नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. दरम्यान, या योजनेत विदर्भातील ऊर्वरित पाच जिल्हयांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मोठी घोषणा : विदर्भात उभारणार सिट्रस इस्टेट
या दुसऱ्या टप्प्यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च येणार असून, या प्रकल्पासाठी डॉलर्स विनिमय दरामधील फरकामुळे अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास देखील मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता या प्रकल्पाचा खर्च 5 हजार 469 कोटी रुपये इतका होणार आहे.
या प्रकल्पाच्या 4 हजार कोटींच्या मुळ किंमतीमध्ये डॉलर्सच्या वाढत्या दरामुळे 690 कोटी रुपये वाढ झाली आहे. यातील 483 कोटी रुपये जागतिक बँकेकडून मिळणार आहेत. तसेच उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 779 कोटी रुपये असा 1 हजार 469 कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. यासाठी कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गाव निवड समिती स्थापन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 4 हजार 682 गावे, जळगाव जिल्ह्यातील 460 गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 142 अशा एकूण 5 हजार 220 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
फायद्याची माहिती : घरच्या घरी तपासा बियाण्याची उगवण क्षमता

https://www.facebook.com/shetimitramagazine03













Users Today : 19
Users Last 30 days : 772
Users This Month : 97
Users This Year : 809
Total Users : 236258