राज्याच्या राजकारणात आज आणि आत्ता मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादीरात मोठी फूट पडली आहे.
मोठी बातमी : राज्यातील 36 धरणे अद्यापही कोरडीच !
अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनात दाखल झाले होते. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादीच्या 54 पैकी 30 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांचा
हेही वाचा : हळदीच्या वायद्यांमध्ये मोठी तेजी
पहाटेचा शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळपासूनच राजकियी हालचालींचा वेग आलेला होता. आधी अजित पवारांनी त्यांच्या समर्थकांसोबत बैठक घेतली. बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
गुडन्यूज : राज्यात पुढीचे ५ दिवस मुसळधार ते अती मुसळधार ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03













Users Today : 12
Users Last 30 days : 765
Users This Month : 90
Users This Year : 802
Total Users : 236251