भारतीय किचन मधील महात्वाचा असलेला मसाला पदार्थ म्हणजेच जिरा ! जिऱ्याची फोडणी आणि तडका आता महागला आहे. सध्या जिऱ्याची बाजारातील आवक मंदावल्याने आणि मागणी वाढल्याने जिऱ्याच्या भावात तेजी आहे. जिऱ्याचे भाव 55 हजार रुपये क्विंटलवर गेले आहेत. जिऱ्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून बोलले जात आहे.
मोठी घोषणा : तर… पेट्रोल 15 रुपये लिटर दराने मिळेल !
सध्या देशात जिऱ्याचा साठा खूपच कमी आहे. तर देशांतर्गत आणि निर्यातीसाठी जिऱ्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे दरातील तेजी टिकून आहे. वायद्यांमध्ये जिऱ्याने 57 हजारांचा टप्पा पार केला असून, बाजारांमध्ये जिऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी 55 हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.

सध्या बाजारात जिऱ्याची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे दरात तेजी आहे. बाजारातील आवक गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक कमी झाली. त्यातच राजस्थान आणि गुजरातमधील जिरा पिकाची काही प्रमाणात काढणी शिल्लक होती. त्यातच बिपरजॉय चक्रीवादळामुळे पिकाचे मोठे नुकसान झाल्याने आवकेवर परिणाम झाला आहे. यामुळे सध्या जिऱ्याच्या दरातील तेजी कायम आहे.
महत्त्वाचे : शेतकऱ्यांच्या अडचणी निवारण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापन
देशात यंदा जिऱ्याची मागणी 4 लाख 50 हजार ते 5 लाख टनांपर्यंत राहू शकते. तर यंदा जिऱ्याचा पुरवठा 3.5 ते 4 लाख टनांपर्यंत होऊ शकतो, असा अंदाज आहे. या सर्व कारणांमुळे जिऱ्याचे भाव राजस्थान आणि गुजरातमधील महत्वाच्या बाजारांमध्ये सरासरी 55 हजार रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत.
यंदा अनेक कारणांमुळे देशातील जिऱ्याचे उत्पादन घटले आहे. मात्र नवा जीरा बाजारात आल्यानंतर दरात बदल होऊ शकतो, असा अंदाज गृहीत धरून घाऊक व्यापारी खरेदीत जास्त इच्छूक दिसत नाहीत. यामुळे दरात काहीसे चढ उतारही दिसत आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर जिरा उत्पादक देशांमध्ये उत्पादन कमी झाले. त्यामुळे भारताकडे मागणी आहे. पण देशातही पुरवठा कमी असल्याने जिऱ्याचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
नक्की वाचा : खुद्द कृषी आयुक्तांनी सांगितली… राज्यातील खरीपाची सध्यस्थिती

https://www.facebook.com/shetimitramagazine03