कोथिंबीरीला वर्षभर चांगली मागणी असते. कोथिंबीरीची लागवड ही प्रामुख्यारने पावसाळी (खरीप) व हिवाळी (रब्बी) हंगामात केली जाते. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर चे उत्पन्न कमी निघत असले तरी मागणी प्रचंड असल्याने बाजारात चांगला भाव मिळतो त्यामुळे बरेच शेतकरी उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करतात.
महत्त्वाच्या टिप्स : भाजीपाल्यासाठी पाणी व्यवस्थापन
कोथिंबीर लागवडीसाठी जमीन : कोथिंबीरीच्या (धणे) लागवडीसाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन योग्य असते. परंतु जमिनीत सेंद्रिय खते जास्त प्रमाणात असतील तर हलक्या किंवा भारी कसदार असलेल्या जमिनीत देखील कोथिंबीर लागवड करू शकतो. तसे पाहता कोथिंबीरीची लागवड ही कोणत्याही हवामानात करू शकतो परंतु अति पाऊस किंवा अति ऊन असेल तर कोथिंबीरीची वाढ हवी तशी होत नाही.
उन्हाळ्यात कोथिंबीरीची वाढ कमी असते पण मागणी जास्त असल्याने बाजारात भाव चांगला असतो त्यामुळे पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करून जास्त नफा मिळवता येतो.

कोथिंबीर लागवडीपूर्वी मशागत : कोथिंबीरीची लागवड करण्याआधी जमीन नांगरून व कुळवून चांगली भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीत एकरी 6 ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. त्यानंतर 3 × 2 मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. आपण या वाफ्यात बी फेकूनही लागवड करू शकतो. बी फेकून लागवड करताना बी सारखे पडेल याची काळजी घ्यावी. बी फेकून लागवड करायची नसेल तर वाफ्यामध्ये 15 से.मी. अंतरावर खुरप्याने ओळी पाडून त्यात बी पेरु शकतो.
आधुनीक तंत्र : लसूण पीक उत्पादनाचे तंत्रज्ञान
उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करायची असेल तर पेरणीपूर्वीच वाफे भिजवावेत आणि मगच वाफसा आल्यानंतर त्यात बी फेकून किंवा ओळी पाडून त्यात बी टाकून पेरणी करावी.
कोथिंबीर लागवडीसाठी बियाणे : कोथिंबीर लागवडीसाठी एकरी 25 ते 35 किलो बियाणे लागते. बियाण्यासाठी धण्याचा वापर केला जातो. लागवडीपूर्वी धणे हळुवार रगडुन फोडून घ्यावेत. त्यातील बी वेगळे करावेत. पेरणीपूर्वी धण्याचे बी भिजऊन मग गोणपाटात गुंडाळून ठेवावे. त्यामुळे उगवण लवकर होते शिवाय उत्पादनातही वाढ होते.
धण्याच्या स्थानिक आणि सुधारित जाती : धण्याच्या व्ही-1, व्ही-2, को-1, डी-92, डी-94, जे-214, के-45, कोइमतूर-1, कोइमतूर-2, लाम सी.एस.-2, लाम सी.एस.-4, स्थानिक वाण, जळगाव धना, वाई धना या स्थानिक आणि सुधारित जाती लागवडीसाठी वापरल्या जातात.
खत व पाणी व्यवस्थापन : कोथिंबीर लागवडी आधी जमिनीत एकरी 6 ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. बी उगवल्यानंतर 20 दिवसांनी हेक्टरी 40 किलो नत्र द्यावे. त्याचसोबत 25 दिवसांनी 100 लिटर पाण्यात 250 ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारण्या करू शकतो, ज्यामुळे कोथिंबीरीची वाढ चांगली होते.
लक्षवेधी पीक : जाणून घ्या टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान !
कोथिंबीर पिकाला नियमित पाणी गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये दर 5 दिवसांनी तर हिवाळ्यामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे.
कीड व रोग व्यवस्थापन : कोथिंबीर पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. कधी कधी मर, भुरी या रोगांचा प्रार्दूभाव दिसतो. अशावेळी शिफारसीनुसार भुर रोगासाठी भुरी प्रतिबंधक वापरू शकतो. तसेच पाण्यात विरघळणारे गंधक वापरावे.

पेरणी नंतर 35 ते 40 दिवसानी कोथिंबीर 15 ते 20 से. मी. उंचीची होते. त्यावेळी ती उपटून किंवा कापून काढणी करावी. पेरणीच्या 2 महिन्यांनंतर कोथिंबीरीला फुले यायला सुरवात होते; त्यामुळे त्या आधीच काढणी करणे महत्वाचे असते. पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबीरीचे एकरी 4 ते 6 टन उत्पादन मिळते तर उन्हाळी हंगामात हेच उत्पादन 2.5 ते 3.5 टन मिळते.
महत्त्वाचा लेख : जाणून घ्या ! ढेमसे लागवडी विषयी

https://www.facebook.com/shetimitramagazine03













Users Today : 8
Users Last 30 days : 761
Users This Month : 86
Users This Year : 798
Total Users : 236247