राज्यातील कांदा उत्पादकांना दरातील घसरण व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी प्रति क्विंटल 350 रुपये याप्रमाणे दिले जाणारे अनुदान 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधान परिषद सभागृहात दिली.
मोठा निर्णय : शेतकऱ्यांना फसवणुकीच्या तक्रारीसाठी व्हॉट्स ॲप क्रमांक मिळणार !
दरातील घसरण व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयाने घेतला होता. मात्र अध्याप अनुदान देण्यात आले नव्हते, त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना अनुदान देण्यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सत्तार म्हणाले, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक तसेच नाफेडकडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधी लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मोठी बातमी : चंद्रपुरात ढगफुटी; उद्याही मुसळधार ?
राज्यातील 3 लाख कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले असून त्यांना अनुदान देण्यासाठी या अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून 550 कोटी रुपयांची मागणी वित्त विभागाकडे केली आहे. ही मागणी मंजूर झाल्यानंतर 15 ऑगस्टपूर्वी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील,
असे सत्तार यांनी सांगितले. तसेच 31 मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदा होता, मात्र त्यांनी ई-पीक फेऱ्याची नोंद केलेली नाही किंवा मार्केट कमिटीमध्ये नोंद केलेली नाही त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही 200 क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्यात येईल,
तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बियाण्यांची कमतरता भासणार नाही, असेही सत्तार यांनी सभागृहाला आश्वासन दिले. या प्रश्नावरील चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतेज पाटील, नरेंद्र दराडे, शशिकांत शिंदे, भाई जगताप आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
पावसाळी अधिवेशन : बोगस खते-बियाण्यासंदर्भात कडक कायदा आणणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://www.facebook.com/shetimitramagazine03