खते आणि बोगस बियाणांच्या मुद्यांवरुन सभागृहात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या मुद्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला. बोगस बीयाणांच्या संदर्भात किती जणांवर कारवाई केली याची माहिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली. तसेच खतांच्या वाढत्या किंमतीच्या मुद्यावरुन देखील विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
महत्त्वाची बातमी : शेतकऱ्यांच्या थेट तक्रारीसाठी व्हॉट्स ॲप क्रमांक जाहीर
दरम्यान, बोगस बियाणांच्या संदर्भात अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, बोगस बियाणांच्या संदर्भात 1966 चा कायदा आहे. बीटी कॉटनचा कायदा आला. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होते हे मी मान्य करतो, पण आता त्यासाठी आपण कायदा आणत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 1966 च्या कायद्यात असा गुन्हा केला तर 500 रुपयांचा दंड आहे.
दुसऱ्यांदा गुन्हा केला तर एक हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतरही गुन्हा केला तर परवाना रद्द अशी तुटपुंजी तरतुद आहे. बोगस बीयाणांच्या बाबतीत कारवाई करण्यासाठी समिती कठीण केलेली आहे. आता बीटी कॉटन प्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे मुंडे म्हणाले. आम्ही सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान, वाढलेल्या खतांच्या किंमतीच्या मुद्यावरुन देखील विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खतांच्या किंमतीच्या मुद्यावरुन सरकारला प्रश्न विचारले. आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांच्या किंमती एवढ्या कमी झालेल्या आहेत. मग या ठिकाणी का होत नाहीत ? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी सरकारला केला. खत आणि बियाणांच्या बाबतीत काय कारवाई केली? याच उत्तर दिले पाहिजे असेही थोरात यावेळी म्हणाले.
मोठी बातमी : 15 ऑगस्टपर्यंत कांद्याचे अनुदान जमा होणार
राज्यात बोगस बियाणे ब्रँडेड कंपन्यांचे नाव वापरून विक्री केले जाण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. यावर शासनाचे नियंत्रण नाही, त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या महाबीज यासारख्या लोकप्रिय बियाणांची अधिकच्या आणि चढ्या भावाने दुकानदार विक्री करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
मोठा निर्णय : शेतकऱ्यांना फसवणुकीच्या तक्रारीसाठी व्हॉट्स ॲप क्रमांक मिळणार !
https://www.facebook.com/shetimitramagazine03