Bogus Seed गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. यंदा मान्सून उशीरा दाखल झाल्याने पेरण्याचे वेळापत्रक बिघडले. यातून सावरत शेतकर्यांनी महागड्या बियाण्याची खरेदी करून पेरणी केली तर ते बोगस निघाल्याने उगवणूच आले आले नाही. असे प्रकार वाढले असून, सध्या शेतकऱ्यांसमोर बोगस बियाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
मोठी घोषणा : खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार : कृषिमंत्र्यांची घोषणा
यासंदर्भात अत्तापर्यंत सुमारे 1 हजार 85 तक्रारी दाखल झाल्या असून, यातील बहुतांश तक्रारी या कापूस आणि सोयाबीन बियाण्याच्या आहेत. ज्यात सर्वाधिक 200 तक्रारी लातूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. आलेल्या एकूण तक्रारींपैकी 927 पंचनामे झाले आहेत.
जिल्हानिहाय बोगस बियाण्याच्या अशा आहेत तक्रारी

शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्याच्या घटना दरवर्षी समोर येत असतात. मात्र, थातूरमातूर कारवाई केल्या जात असल्याने हे प्रकार वाढत चालले आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी कर्ज काढून महागड्या बियाणांची खरेदी करतो. पेरणी केल्यावर चांगले पीक येईल आणि उत्पन्न होईल, अशी अपेक्षा त्यांना असते. मात्र, अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक केली जाते.

हेही वाचा : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली गोगलगाय प्रदुर्भावाची पहाणी : नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
राज्यात बोगस बियाणाच्या ताकारी येत असतानाच कृषी विभागाने पंचनामे सुरु केले आहे. तर बोगस बियाणेविरोधात कारवाईला देखील सुरुवात केली आहे. राज्यात आतापर्यंत प्रतिबंधित एचबीटी कपाशीचे 3 हजार 799 पाकिटे जप्त करण्यात आले आहेत. तर 885 कांदा बियाणे पाकीट, सोयाबीनचे 5 हजार 264 पाकीट जप्त करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत एकूण 1 हजार 88 पंचनामे करण्यात आले आहेत.
मान्सून अपडेट्स : पुन्हा पुढील पाच दिवस पाऊस !
