Crop Insurance : शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने 3 दिवसाची मुदतवाढ (Term Extension) दिली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची आज म्हणजेच 31 जुलै अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र त्यामध्ये 3 दिवसाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार आहे.
मोठी घोषणा : हमीभावासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाची निर्मिती : कृषिमंत्री धनंजय मुंडे
राज्यात अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊनसारख्या तांत्रिक अडचणी आणि अतिवृष्टीमुळे वाहतुक बंद असल्याने पीक विमा भरण्यात शेतकऱ्यांना (Farmar) अडचणी येत होत्या. त्यामुळे अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अखेर केंद्र सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेतून केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. पण गेल्या काही दिवसांपासून पीक विम्यासाठी अर्ज भरताना सरकारची वेबसाईट हँग होण्याचा प्रकार घडत होता. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सीएससी सेंटरवर पीक विमा (Crop Insurance) भरण्यासाठी चकरा मारव्या लागत होते.
नक्की वाचा : जळगाव जिल्ह्यात 628 शेतकऱ्यांना बोगस खताचा फटका
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पीक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पीक विमा भरण्यासाठी केंद्राकडून 3 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ (Term Extension) देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.
मोठा निर्णय : कृषी शिक्षण प्रवेश प्रक्रिया आता अभियांत्रिकी प्रमाणे होणार !

https://www.facebook.com/shetimitramagazine03