Wildlife Attacks : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना मिळणार 25 लाख रूपये

0
530

Wildlife Attacks : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना (Heirs of Dead) शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात (Funding) भरीव वाढ करण्यात आली असून, आज विधानपरिषदेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापुढे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

ब्रेकिंग न्यूज : पीक नुकसानीची माहिती कळविण्याची मुदत वाढवण्याची कृषीमंत्र्यांची घोषणा

राज्यात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली असून मानव वन्यजीव संघर्षामध्येही वाढ होत असल्याचे सांगून, वनमंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजने अंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून (Forest Department) सुरू आहे.

मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे, व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यामुळे त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते; याची दखल शासनाने संवेदनशीलपणे घेतली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास अथवा गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात ही भरीव वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मोठी बातमी : माती परिक्षण आणि बीज संशोधनावर भर देणार : कृषी मंत्री धनंजय मुंडे

यासंदर्भात शासन निर्णय (Government dicision) जरी करण्यात आला असून, त्यानुसार वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीला कायम अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रुपये, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी येणार खर्च देण्यात येणार आहे. तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या वारसांना 25 लाख रुपये आर्थिक सहकार्य करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा 50 हजार प्रति व्यक्ती असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

या शासन निर्णयानुसार वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड किव्हा वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या 25 लाख रुपयाच्या रक्कमेपैकी रुपये 10 लाख रुपयांची रक्कम देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे तर उर्वरित 10 लाख रुपये पाच वर्षांकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे आणि उर्वरित 5 लाख रुपये दहा वर्षाकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

शासकीय योजना : 1 रुपयात पीक विम्याला एतिहासिक प्रतिसाद : दीड कोटी शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here