Tomato Import : सध्या देशात टोमॅटोच्या दरात वाढ (Tomato Price) मोठी वाढ झाली असून, बाजारात 150 ते 200 रुपये प्रतिकिलो या दराने टोमॅटोची विक्री केली जात आहे. या वाढत्या किंमतीवर नियंत्रण (control price) ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटोची आयात (Import Tomatoes from Nepal) करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance minister Nirmala Sitharaman) यांनी दिली लोकसभेत आहे.
ब्रेकिंग : कसे असतील टोमॅटोचे दर : 30 की 300 ?
टोमॅटो आयातीचा पहिला लॉट आज उत्तर भारतातील वाराणसी, लखनौ आणि कानपूर शहरात पोहोचण्याची शक्यता असल्याचे सांगून केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या, सध्या घाऊक बाजारात टोमॅटोच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या 150 ते 200 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री केली जात अस्क्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, अवकाळी पाऊस, जास्त तापमान आणि पिकावर झालेला विषाणूंचा प्रादुर्भाव (Virus Outbreak) याचा टोमॅटो दरवाढीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी टोमॅटोचे पीक वाया गेले आहे. परिणामी टोमॅटो उत्पादक शेतकरी (Farmar) अडचणीत सापडला आहे. टोमॅटोचे पिकाचे नुकसान झाल्यामुळे बाजारात टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे दरात वाढ (price rise)होताना दिसत आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला याचा परिणाम दरावर झाला आहे.
दरम्यान, टोमॅटोच्या किंमतीत झालेल्या वाढीबरोबरच तृणधान्ये (cereals), डाळींच्या (pulses) किमंतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई वाढल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Reserve Bank of India Shaktikanta Das) यांनी दिली. ते चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत बोलत होते. भाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. जून आणि जुलै महिन्यात टोमॅटोच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई वाढल्याचे दास म्हणाले.
नक्की वाचा : 8 राज्यातील 4.09 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली

https://www.facebook.com/shetimitramagazine03












Users Today : 3
Users Last 30 days : 756
Users This Month : 81
Users This Year : 793
Total Users : 236242