Onion Rate : टोमॅटो (Tomato) पाठोपाठ आता कांदाही (Onion) महागण्याची शक्यता निर्माण झाल्याने केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकाला (consumers) दिलासा मिळणार आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion growers) मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी : टोमॅटो पाठोपाठ आता कांदाही महागणार ?
यंदा कांद्याचे दर (Onion Rate) कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संपूर्ण कांद्याचा हंगामच वाया गेला. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे देखील कठीण होऊन बसले. कांद्याची टिकवण क्षमता (Onion shelf Life) कमी असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला.
यंदा कांदा लागवडीला उशिर झाला आणि उन्हाळी कांद्याला (Summer Onions) अवकाळी आणि वादळी पावसाचा जोरदार फटका बसल्याने बाजारात दर्जेदार कांदा (Quality Onions) कमी येण्याची शक्यता आहे. यामुळे दर्जेदार कांद्याचे दर दुप्पट होण्याची भिती केंद्र सरकारलाही वाटत आहे. यामुळे देशातील बहुतांश शहरांमध्ये कांद्याच्या किंमत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ब्रेकिंग न्यूज : दरवाढीच्या नियंत्रणासाठी टोमॅटोची नेपाळमधून आयात : अर्थमंत्री सीतारामण
गेल्या महिन्यात कांद्याचे भाव 10 ते 15 रुपये प्रतिकिलो होते. ते आता 28 ते 32 रुपयांपर्यंत गवले आहेत. ऑगस्टअखेरीस किरकोळ बाजारात (Retail market) कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरवठ्यात कमतरता असल्याने पुढील महिन्यात ही वाढ सुमारे 60 ते 70 रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, एवढी किंमत वाढल्यानंतरही या वाढलेल्या किमती 2020 च्या सर्वोच्च पातळीच्या तुलनेत खालीच राहणार आहेत.
आता कांदाही महागण्याची शक्यता निर्माण झाल्याने केंद्र सरकारकडून कांद्याच्या बफर स्टॉकमधून (Onion Buffer stock) 3 लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या (Central Govt) या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मात्र शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार किरकोळ किमती जास्त असलेल्या राज्यात बफर स्टॉकमधील कांदा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग : कसे असतील टोमॅटोचे दर : 30 की 300 ?
गेल्या चार वर्षांच्या तुलनेत केंद्र सरकारकडील कांद्याच्या बफर स्टॉकचा आकार तिप्पट (Tripal) झाला आहे. 2020-21 मध्ये केंद्राकडील कांद्याचा बफर स्टॉक 1 लाख मेट्रिक टन होता. तो 2023-24 मध्ये 3 लाख मेट्रिक टन इतका झाला आहे.
केंद्राकडील कांद्याचा बफर स्टॉक (Onion Buffer stock) ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आणि किमतीची स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ग्राहक व्यवहार विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. मात्र या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर (Onion growers) मोठा अडचण निर्माण होणार असून, भविष्यात कांदा उत्पादन घ्यावे की न घ्यावे ? असा प्रश्न त्यांच्या समोर पडणार आहे.
नक्की वाचा : 8 राज्यातील 4.09 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली
https://www.facebook.com/shetimitramagazine03