Double sowing crisis : राज्यातील अनेक जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

0
290

Double sowing crisis : राज्यातील अनेक जिल्ह्यात (District) पावसाने खंड दिला असून, खरीप हंगाम (Kharif season) वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश जिल्ह्यात पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता (worries farmers) वाढली आहे. दरम्यान, आजपासून कोकण व विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या 10 दिवसात दमदार पाऊस झाला नाहीतर दुबार पेरणीचे संकट (Double sowing crisis) येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गुडन्यूज : राज्यात 30 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस : डख

यंदा आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली आहे. सुरुवातीच्या पावसावर पिके उगवून आली मात्र आता पाण्याची गरज असल्याच्या वेळी मात्र पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली (Kharif crop growth stunted) आहे. पिकांना पावसाच्या पाण्याची नितांत गरज (need rain) आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर आता एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटले असले, तरीही अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी हलका ते मध्यम पावसावर कापूस, सोयाबीन, तूर, भुईमुग आही पिकांची पेरणी केली आहे. शेतकऱ्यांनी निंदणी व कोळपणी ही आंतर मशागतीचे (Inter-cropping) कामेही उरकूली आहेत. सध्या पिकांना खते (Fertilizers) आणि फवारणीची (spraying) गरज आहे. मत पाऊस नसल्याने ही कामे थांबली आहेत.

मोठी बातमी : थकित एफआरपी ठेवणाऱ्या 4 साखर कारखान्यांविरुघ्द जप्तीचे आदेश

पिकाला पाणीच नाहीतर खते घालून आणि फवारणी करून काय उपयोग ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. येणाऱ्या आठ दहा दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी (Double sowing) करावा लागणार अशी परिस्थिती आता अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी कशीबशी आटोपली आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी जोरदार पाऊस पडलेला नाही. अनेकांनी पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे (drip irrigation) पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र जोरदार पाऊस नसल्याने जमिनीतील पाणीपातळीही (Soil water level) घटू लागली आहे. परिणामी विहरी व बोरवेलचे पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाले आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतर्गत मशागतीवर भर दिलेला आहे. वारंवार कोळपणी आणि निंदणी करून तन वाढु न देण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत, जेणेकरून पिकांना तूरळक पावसातही तग धरायला मदत होईल. मात्र मेहनतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही (Production cost) वाढत आहे आणि शेतकऱ्यांना जास्त मेहनतही घ्यावी लागत आहे. येणाऱ्या काळामध्ये पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

महत्त्वाचे : कांद्याबाबत केंद्राने घेतला मोठा निर्णय :  कांदा उत्पादकांना बसणार फटका

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here