Onion Export Duty Increase : कांद्याची दरवाढ (Rate Increase) स्थिर ठेवून देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने (Central Government) कांदा निर्यातीबाबत (Onion Export) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने शनिवार (दि. 19) पासून कांद्याच्या निर्यातीवर तब्बल 40 टक्के शुल्क (Export Duty) लावले आहे. हे शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.
चिंताजनक : पावसाआभावी राज्यातील अनेक जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने (Central Finance Ministry) यासंदर्भातील अधिसूचना (Notification) जारी केली असून, प्रमुख राज्यांच्या तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Sanctions Assembly Elections) दरवाढीचा फटका बसू नये म्हणून सरकारने निर्यातीवर अप्रत्यक्ष निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे कांद्याचे उत्पादन (Onion Production) घटले आहे. परिणामी कांद्याचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात जुलै ते ऑगस्ट या कालावधीत कांद्याच्या किमती (Onion Rate) 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या भाव प्रति क्विंटल 2400 रूपयांवर पोहोचले आहेत. सप्टेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
गुडन्यूज : राज्यात 30 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस : डख
कांद्याची दरवाढ स्थिर ठेवण्यासाठी निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. वाढीव निर्यातशुल्कामुळे जागतिक बाजारपेठेत (World Markets) भारतीय कांदा कमी प्रमाणात जाईल. परिणामी देशातील स्थानिक बाजारांत कांद्याचे दर घसरतील असा सरकारचा अंदाज आहे.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातशुल्क (Export Duty) वाढीच्या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट (Wave of Outrage) उसळली आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटना (Farmers Union) आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच काही बाजारसमित्यांमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी केंद्राच्या अधिसूचनेची होळी (Notification Holi) केली.
दरम्यान, सरकारच्या निर्यातशुल्क (Export Duty) वाढीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी घाबरून कमी किंमतीला कांदा विकू नये, पॅनिक सेलिंग टाळावे आणि टप्प्याटप्प्याने माल विकण्याचा पवित्रा घ्यावा, असे आवाहन बाजार अभ्यासकांनी केले आहे.
मोठी बातमी : थकित एफआरपी ठेवणाऱ्या 4 साखर कारखान्यांविरुघ्द जप्तीचे आदेश
https://www.facebook.com/shetimitramagazine03