Agricultural University News : कृषिमंत्र्यांनी दिल्या कृषी विद्यापीठांना या सक्त सूचना

0
273

Agricultural University News : कृषी विद्यापीठातील (Agricultural University) सकारात्मक घडामोडींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. यापुढे राज्यातील हवामान बदल, शेतीतील नवनवीन प्रयोग, संशोधन आणि सकारात्मक घडामोडी याबाबतची माहिती (Infarmesan) माध्यमांपर्यंत (Media) तातडीने पोहोचवण्याच्या सक्त सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी कृषी विद्यापीठांना दिल्या आहेत.

ब्रेकिंग : केंद्राच्या धोरणावर कांदा उत्पादक संतापले

राज्यातील कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञांची धनंजय मुंडे यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजूर उपलब्ध झालेच तर मजुरीचे दर शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. त्यामुळे ड्रोनद्वारे शेतीमधील खते (Fertilizers) आणि कीटकनाशक फवारणी (Pesticide Spraying) अशी कामे होणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.

त्यामुळे यंदाच्या चालू खरीप हंगामात राज्यातील कृषी विद्यापीठांनी (Agricultural University) शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोनद्वारे (Drone) फवारणीचे पथदर्शी प्रकल्प (Pilot Projects) राबवावेत असे निर्देश (instructions) मुंडे यांनी यावेळी दिले.

मोठी बातमी : केंद्राचा कांदा निर्यातीवर अप्रत्यक्ष निर्बंध : निर्यातशुल्कात 40 टक्के वाढ

राज्यातील कृषी विद्यापीठांनी (Agricultural University) देशात आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा व्यक्त करून कृषीमंत्री मुंडे म्हणाले, कृषी (Agricultural) क्षेत्रात ड्रोनच्या वापरामुळे युवकांना रोजगाराची संधीही (Opportunities) उपलब्ध होणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षण संस्था (आर.पी.टी.ओ.) अंतर्गत सुरु असलेले ड्रोन प्रशिक्षण केंद्र (Drone Training Center) इतर विद्यापीठातही चालू करण्यासंदर्भात प्रकल्पाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष कराड, तसेच कृषी  विद्यापीठाचे संबंधित विभागाचे संशोधन अधिकारी, प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या बैठकीनंतर कृषी विभागाने एक परिपत्रक जारी करुन कृषी विद्यापीठांमधील घडामोडींची, नवीन प्रयोगांची माहिती माध्यमांना तातडीने देण्याच्या सूचना केल्या आहेत. 

चिंताजनक : पावसाआभावी राज्यातील अनेक जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here