Popatrao Pawar : सध्या राज्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची (Drought) चाहूल लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा ताळेबंद आखून पुढील पावले टाकणे गरजेचे आहे. असे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे (Hiwre Bazar) कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी व्यक्त केले आहे.
ब्रेकिंग : पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार ?
राज्य सरकारने आतापासूनच जनावरांच्या चाऱ्याबाबत (Animal fodder) नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले, सध्या राज्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे खरिपाची पिके (Kharipa crops) वाया जाण्याची भीती आहे. याचा परिणाम दुग्ध व्यवसायावरही (Dairying) झाला आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायिक शेतकरीही अडचणीत सापडण्याची शक्यता पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.
पावसाच्या (Rainfall) या पार्श्वभूमीवर 100 टक्के पीक वाचवण्यासाठी प्रयत्न न करता काही पीक सोडून द्यावे लागेल असे सांगून, पवार पुढे म्हणाले, प्राधान्यक्रमाने पिण्याचे पाणी, जनावरांच्या चारा (Animal fodder) पिकासाठी लागणारे पाणी आणि शेवटी फळबागा वाचवण्यासाठी लागणारे पाणी अशा प्रकारे पाण्याचा वापर करावा लागणार आहे. सरकारने आतापासूनच जनावरांच्या चाऱ्याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. ही खबरदारी न घेतल्यास, जनावरांच्या चाऱ्याच्या किंमती ऐनवेळी गगनाला भिडतील अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.
मोठी बातमी : कांदा उत्पादक आक्रमक : कांदा लिलाव बंद
https://www.facebook.com/shetimitramagazine03