Kharif Sowing : राज्यात खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणीचे क्षेत्र सरासरी 142 लाख हेक्टर असून आतापर्यंत प्रत्यक्षात 141.09 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचे आकडेवारी कृषी विभागाकडून उपलब्ध झाली आहे. यंदा सर्वसाधारण 99 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
आवाहन : रासायनिक खतांचा वापर 20 टक्क्यांनी कमी करा : मांडवीया
राज्यात पेरणीची कामे पूर्ण झाली असून, आतापर्यंत राज्यात सोयाबीन (Soybean) पिकाची 50.72 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस (Cotton) पिकाची 42.30 लाख हेक्टर, तूर (Tur) पिकाची 11.15 लाख हेक्टर, मका (Maize) पिकाची 9.11 लाख हेक्टर, तर भात (Rice) पिकाची 15.28 लाख हेक्टरवर पुनर्लागवड झाली आहे.

यंदा राज्यात मान्सून उशिरा (monsoon) दाखल झाला आणि जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात थोडाफार पाऊस (Rain) झाल्याने पिकांना जीवनदान मिळाले. मात्र, संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्या ऑगस्ट महिण्यात पावसाचा मोठा खंड पडला. राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये (Revenue Board) 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड, तर 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांपासून पाऊसच पडला नाही. त्यामुळे या भागात पिकांची दयनीय अवस्था पहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत जर पाऊस (Rain) झाला नाही तर ही पिके पूर्णत: वाया जाण्याचे शक्यता आहे.
नक्की वाचा : ई-पीक पाहणी सर्व्हरचा फज्जा
यंदा राज्यात सामाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागातील पाझर तलावातील पाणी देखील आटले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न (Water Question) निर्माण होत आहे. शिवाय जनावरांच्या चाऱ्याचीही समस्या निर्माण झाली आहे. पावसा अभावी पिके तर अक्षरशः करपून चालली आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने प्रकल्पातील पाणीसाठा देखील चिंता वाढवणारा ठरत आहे.
राज्याच्या बहुतांश भागात पावसाने (Rain) दडी मारली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, शेतकऱ्यांना (Farmers) सध्या चांगल्या पावसाची गरज आहे. कारण खरीपाची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मोठी बातमी : आता पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार पीक विमा

https://www.facebook.com/shetimitramagazine03