OnionMarket : नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद !

0
325

Onion Market : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी (Onion Traders) आपल्या प्रलंबीत मागण्यासाठी (Pending Demands) आजपासून बेमुदत बंद (Indefinite Shutdown) पुकारला आहे. आज नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 15 बाजार समित्या (Market Committee) व उपबाजार समित्यांनी कडकडीत बंद पाळला.

ब्रेकिंग : यंदा ऊस हंगाम वादात सापडण्याची चिन्हे

आजच्या या बंदमुळे नाशिक जिल्ह्यात कांदा (Onion) प्रश्न पुन्हा पेटला असून, कांदा उत्पादक (Onion Producer) शेतकऱ्यानंतर आता कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. गेल्या काही महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची (Onion Farmers) अनेक आंदोलन झाली. सुरवातीला केंद्र सरकारने निर्यात शुल्क (Onion Export Duty) वाढविल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यानंतर केंद्राने नाफेडकडून (Nafed) खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आता कुठे कांदा लिलाव (Onion Auction) सुरु होते, तोच आता कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद (Indefinite Shutdown) पुकारला आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत (Collector) झालेल्या बैठकीत तोडगा निघू न शकल्यामुळे आजपासून कांदा लिलाव (Onion Auction) बंद ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान यापूर्वीच कांदा निर्यात शुल्क (Onion Export Duty) वाढविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. अनेक दिवस आंदोलने सुरु होती. त्यातच व्यापारी वर्गाचेही नुकसान होत असल्याने नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने (Onion Traders Association) आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री व पणनमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठक घेण्यात आली. मात्र, व्यापारी वर्गाने निवेदनात मांडलेल्या मागण्यांवर बैठकीत तोडगा (Settlement) निघू शकलेला नाही.

हेही वाचा : चांगला दर मिळेल तिथे आम्ही ऊस घालू : स्वाभिमानीची भूमिका

गेल्या काही महिन्यापासून कांदा प्रश्न चांगलंच चर्चेत आला आहे. निर्यात शुल्क (Export Duty) वाढविल्यानंतर अनेक दिवस कांदा लिलाव (Onion Auction) देखील बंद होते. तसेच बाहेर राज्यातील वाहतूक देखील बंद होती. त्यामुळे यापूर्वीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या एकीकडे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट (Drought Relief) असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे.

महत्त्वाची बातमी : मराठवाड्यातला दुष्काळ हटविण्यासाठी 46 हजार कोटीचा निधी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here