Ghatasthapana : काल पितृपक्ष पंधरवाडा संपल्याने आजपासून नवरात्री (Navratri) महोत्सवाला सुरूवात होत आहे. आज 15 ऑक्टोंबर घटस्थापना (Ghatasthapana) आहे. शेतीच्या दृष्टीने घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटस्थापनेपासून रब्बी हंगामाला (Rabi season) सुरूवाता होते. घटस्थापना ही शेती आधारित वैज्ञानिक संकल्पना (scientific concept) आहे.
ब्रेकिंग : लम्पीच्या बचावासाठी जनावरांनाही पीपीई किट : सांगोल्यातील पशुपालकाचा प्रयोग
घटस्थापना म्हणजे, बियाणे (Seed), माती (Soil) , पाणी (Water) आणि हवामानाची चिकित्सा (Water Resources) करणारी पारंपारिक परंतू, शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे. घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी (Rabi) पिकांचा हंगाम सुरु होण्याच्या आधी केली जाते.
घटनस्थापना करताना पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस (Nine Days) रोज पाणी (Water) घातले जाते. नवव्या दिवशी तळी (Tali) उचलून घटाचे विसर्जन केले जाते.
घटस्थापनेसाठी वापरण्यात येणारी काळी माती ही शेतकरी ज्या शेतात तो रब्बी पीक घेणार आहे त्याच शेतातील वापरली जाते. कारण ज्या शेतात तो पीक घेणार आहे त्या शेतातील मातीचे हे परिक्षण असते. या मातीत मिसळलेले बियाणे हे कोणतेही बियाणे (Seed) वापरले जात नाही तर रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकाचेच किव्हा शेतकरी त्याच्या शेतात पेरणार आहे आणि त्याच्याकडे उपलब्ध असणारे बियाणेच घटस्थापनेसाठी वापरले जाते. त्या मागचा हेतू त्याच्या शेतात वापरले जाणाऱ्या बियाणांची उगवण क्षमता (germination capacity) किती आहे हे तपासणे असते.
मोठी बातमी : कृषी उत्पादक कंपन्यांच्या संख्येची अट शिथिल करा : कृषिमंत्र्यांचे वर्ल्ड बँकेला सूचना
घटामध्ये नऊ दिवस जे पाणी घातले जाते ते कुठलेही वापरले जात नाही, तर शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरणार आहे त्याच जलस्त्रोत्राचे पाणी घटामध्ये घातले जाते. घट हा मातीचा आणि कच्चा भाजलेलाच वापरला जातो. तो इतर कोणत्याही धातुचा वापरायचा नसतो. कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे आवश्यक असते. जेणेकरुन त्याच्या खाली शंकू आकारात ठेवलेल्या मातीत आणी त्यात टाकलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपयोग होतो.
घट नऊ दिवसच का बसवला जातो असा सर्वांना प्रश्न पडला असेल. तर त्याचे कारण बियांना रुजून अंकुर (Ankur) बाहेर पडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागतो. घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. परंतू नवव्या दिवशी शेजारील पाच व्यक्तिंकडून तळी (tali) उचलली जाते, म्हणजे घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी केली जाते. जे पीक जोमाने आले आहे ते पीक शेतात पेरण्यासाठी निवडले जाते. या सर्वानुमते घेतलेल्या निर्णायाला चांगभल (Changbhal) येळकोट (Yelkot) अशा घोषणा देवून सर्व मान्यता दिली जाते.
या उपटलेल्या पिकाचा तुरा (Tura) शेतकरी आपल्या टोपी किंवा फेट्याच्या शिरपेचात खोचतो किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधली जाते. त्यामुळे घरोघरी घेण्यात आलेल्या परिक्षणाचे निकाल एकत्र करुन अभ्यासने सोपे जाते. दरम्यान, या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणी बिज परिक्षण (Seed Testing) जसे होते त्याच बरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक (crop Nutrients) आहे याचेही परिक्षण केले जाते.
ब्रेकिंग न्यूज : यंदा 1 नोव्हेंबर पासून ऊसाचे गाळप सुरु होण्याची शक्यता
https://www.facebook.com/shetimitramagazine03