Sharad Pawar : आमचे सरकार आल्यावर आम्ही कृषी समृद्धी योजना ( Krishi Samrudhi Yojana) लागू करणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत करणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
शेतकरी हा तुमच्या माझ्या भुकेची समस्या सोडवणारा राजा आहे. मात्र, सध्या तो सकंटात आहे. या भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांच्या दु:खाकडे बघितले नसल्याची टीका शरद पवार यांनी केली. मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली. या सभेत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी जाहीर
यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच जातनिहाय जनगणना करणार असून, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार तसेच 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत करणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇