गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मान्सूनचा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज जगातील सर्वात मोठ्या अशा ऑस्ट्रेलिया येथील स्टीर या हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे यंदा आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात जोरदार पाऊस राहणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे जर यंदा दमदार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन घसघशीत वाढण्याची आशा आहे. वेळेवर पाऊस पडल्यास त्याचा पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. पिके चांगली आली की, उत्पादनातही भर पडते. एकूणच शेतकऱ्यांबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना चांगलाच दिलासा पावसामुळे मिळतो. शेती उत्पादनाबरोबरच जनावरांच्या चाऱ्यांची व पिण्याच्या पाण्याचाही गरज पूर्ण होते. वेळेवर आणि दमदार पाऊस पडल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या दोन तृतीयांश लोकसंख्या असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा नक्कीच फायदा होणार आहे.

ऑस्ट्रेलियामधील स्टीर हा हवामान विभाग अचूक अंदाजासाठी जगप्रसिद्ध आहे. त्यांनी नुकताच हा हवामानाचा अंदाज वर्तवला असून, त्यांच्या अंदाजानुसार यंदा नीना किंवा एल नीनो ही वादळे येण्याची शक्यता नाही. त्यामुळे सामान्य पाऊस राहाणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात दमदार पाऊस होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. दरम्यान, एक्यूवेकर या हवामान कंपनीनेही भारतात यंदा दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र भारतीय हवामान विभागाने अद्याप याबाबत कोणताही अंदाज वर्तवलाला नाही; कदाचित एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात ते याबाबतचा अंदाज वर्तवतील अशी अशा आहे.
शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी शेतीमित्र मासिकाचे https://www.facebook.com/shetimitramagazine03 फेसबुक पेज लाईक करा !