गुढीपाडव्याचा मुहूर्त ध्यानात घेवून फुलशेती फुलविणारे शेतकरी यंदाही कोरोनाच्या सावटामुळे अडचणीत आले असून, गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठा सुनसान असल्याने गुढीपाडव्याच्या पुजेसाठी लागणार्या फुलांचे दर कमालीचे घसरल्याने राज्यातील फुल उत्पादक विशेषत: झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सन हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तु खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. या दिवशी घरातील देव-देवतांबरोबरच आपापल्या व्यवसायातील गाडी-घोड्यांचीही पूजा केली जाते. तर दुकानाच्या, घराच्या दारावर पाना-फुलांची तोरणे बांधली जातात.

गुढीपाडव्याच्या या संपूर्ण पूजेमध्ये झेंडूच्या फुलाला मोठं महत्त्व असते. त्यामुळे गुढीपाडव्याला बाजारात मोठ्या प्रमाणात आणि चढ्या भावाने विक्री होते. याचा फायदा घेण्यासाठी दरवर्षी गुढीपाडव्याला विक्रीसाठी झेंडू बाजारात यावा; या नियोजनाने फुल उत्पादक शेतकरी शेतात झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. गुढीपाडवा आणि लग्नसराई या हंगामात हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून झेंडूकडे पाहिले जाते. मात्र गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही कोरोना आणि लॉकडाऊनच्या सावडाखाली गुढीपाडवा सजारा होत असल्याने फुल उत्पादक शेतकर्यांच्या पदरी निराशाच आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकर्यांना दर वर्षी सुमारे 75 ते 150 रुपये प्रतिकिलो मिळवून देणार्या झेंडूचा दर 15 ते 25 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकर्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
शेतीमित्र मासिक आता.. शेतकर्यांच्या मोबाईलवर ! शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी #shetimitra magazine चे फेसबुक पेज लाईक करा