हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसू लागला असून फेब्रुवारी मध्यावरच तापमानात कमालीची वाढ होत आहे. काही भागात थंडी असून काही भागात मात्र उन्हाचा चटका असह्य करीत आहे. काल बुधवारी 24 तासात सोलापूर येथे देशातील उच्चांकी 37.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. एकूणच राज्यातील तापमानाने पस्तिशीपार केली असून, राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पंजाब परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, त्यापासून मध्ये प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय राजस्थानात, तसेच दक्षिण अंतर्गत कर्नाटकमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पावसाला पोषक वातारण निर्माण झाले असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
नाबार्डची शेतीसाठी 1 कोटी 43 हजार कोटीची तरतूद
पाणी फाऊंडेशनच्या सोयाबीन डिजिटल पुस्तकाचे झाले लोकार्पण
आता राहणार शेळी-मेंढी विकासाला प्राधान्य
आता भरणार पोलीस पाटलांची रिक्त पदे !
बुधवारी राज्यातल विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे 35.4 (14.7) नगर 37.1 (-), धुळे 36 (11), जळगाव 36.4 (13.7), कोल्हापूर 35.5 (19.8), महाबळेश्वर 31.1 (18.3), मालेगाव 34 (-), नाशिक 35.4 (13.6), निफाड 30.5 (6.6), सांगली 36.9 (18.9), सातारा 35.1 (15.8), सोलापूर 37.4 (22.1), सांताक्रूझ 32.7 (19), डहाणू 29.6 (16.4), रत्नागिरी 32.8 (19.9), औरंगाबाद 34.6 (15), नांदेड 34.2 (17), उस्मानाबाद 34.5 (16.8), परभणी 35.3 (16.9), अकोला 36.4 (18.6) अमरावती 36.2 (16.), बुलडाणा 34.6 (19.5), ब्रह्मपुरी 35.5 (15), चंद्रपूर (16.2), गडचिरोली 34.2 (13.4), गोंदिया 32.2 (14), नागपूर 34 (14.4), वर्धा 34.6 (15.2), वाशीम (20), यवतमाळ 34.5 (20) अशा प्रकारे काल तापमान नोंदले गेले आहे. एकूणच राज्यातील तापमानाने पस्तिशीपार केली
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇