राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अजूनही पाऊस पडला नसल्यामुळे बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. काही भागात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. ज्या भागात खरीप कांद्याची पेरणी झाली आहे तेथे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. खरीप कांद्यावर थ्रिप्स रोग पडत आहे.
हे नक्की वाचा : शिक्षिका ते राष्ट्रपती : द्रोपदी मुर्मु यांचा प्रेरणादायी प्रवास
यंदा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप कांदा पिकाची लागवड केली आहे. या दिवसात हवामानातील बदलामुळे कांदा पिकावर देखरेख आणि योग्य व्यवस्थापनाची गरज भासते, कारण तापमानातील बदलामुळे पिकामध्ये कीटक, रोग आणि तणांची संख्या वाढते. आजकाल खरीप कांदा पिकावर थ्रिप्स किडीचा धोका आहे, याच्या प्रतिबंधासाठी आगाऊ उपाय किंवा सेंद्रिय कीड नियंत्रण फायदेशीर ठरते.
कांदा पिकावरील थ्रिप्स खूपच नुकसान करणारी कीड आहे. पूर्ण देशात कांदा उत्पादन क्षेत्रात याचा प्रादुर्भाव होतो. अनेक वेळा 50 ते 60 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान या किडीमुळे होते. बिजोत्पादनक्षेत्रात उत्पादनावर तसेच उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. ही कीड पानांच्या पोंग्यात लपून राहते. आणि पानांमधील रस शोषून घेते. ज्यामुळे पात वाकून रोपे लहान राहतात. पिकाच्या सुरूवातीला या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कांदे पोसत नाहीत आणि मरून जाते.
नक्की वाचा : सर्पदंश : अशी घ्या काळजी
खरीप कांदा पिकावरील थ्रीप्स किडीचा प्रादुर्भाव दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरुवातीला हे किडे पिकाच्या पानांवर बसून त्यांचा रस शोषतात, त्यामुळे पानांवर चांदीसारखे चमकदार पट्टे तयार होतात. त्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने पानांवर तपकिरी डागही दिसतात. थ्रीप्स हे अतिशय लहान कीटक आणि पांढरे-पिवळे रंगाचे असतात.
खरीप कांदा पिकातील थ्रीप्स किडीच्या प्रतिबंधासाठी कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांची फवारणी फायदेशीर ठरते. शिवाय फोरेट 10 किलो किंवा कार्बोफ्युरॉन 30 किलो प्रति हेक्टरप्रमाणे कांदे लागवडीचे वेळी आणि 30 दिवसांनी मातीमध्ये मिसळून पाणी द्यावे. मोनोक्रोटोफॉस 1.8 मिली किंवा डेल्टामेथ्रिन 0.4 मिली प्रतिलिटर प्रमाणे 10 ते 15 दिवसांचे अंतराने फवारणी करावी. तसेच इमिडाक्लोप्रिड 17.8 SL हे 125 मिली कीटकनाशक 500-600 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी पिकावर फवारणी करावी. खरीप कांदा पिकात किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास कॉनफिडोर 0.5 मिली थ्राईवर 3 लिटर पाण्यात विरघळवून टिपोल सारख्या चिकट पदार्थाची फवारणी करावी. निंबोळी पेंड 1250 किलो प्रतिहेक्टरप्रमाणे जमिनीत मिसळून दिल्याने थ्रिप्स किडीचे नियंत्रण होते.
ब्रेकिंग न्यूज : आवक वाढल्याने मोसंबीचे दर कोसळले !
अनेकदा पाऊस पडल्यानंतर खरीप कांदा पिकामध्ये अनावश्यक तण उगवते. त्यांना रोखण्यासाठी, लागवडीनंतर 20-25 दिवसांनी पहिले तण काढण्याचे काम करा. खरीप कांदा पिकासाठी किमान 3 ते 4 खुरपणीची गरज असते, जेणेकरून तण उपटून फेकून देता येते. पिकात तणांची संख्या जास्त असल्यास रासायनिक औषध मारून नियंत्रण करता येते. यासाठी 2.5 ते 3.5 लिटर पेंडीमेथालिन किंवा 600-1000 मिली ऑक्सिफ्लोरोफेन 750 लिटर पाण्यात मिसळून दर तीन दिवसांनी प्रति हेक्टरी पिकावर फवारणी करावी.
मोठी बातमी : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1