डाळींब निर्यातीला चालना मिळवून देण्यासाठी सांगोला येथे 2 रुपये खर्च करून 1800 मेट्रिक टन क्षमतेचे भव्य शीतगृह उभारण्यात आले असून, ते राज्यातील दुसरे सर्वात मोठे शीतगृह असून, पुणे विभागातील सर्वात मोठे म्हणजेच पहिले शीतगृह आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत केंद्र शासनाकडून जवळपास 75 टक्के तर वखार महामंडळ कडून २५ टक्के असे 2 कोटी रुपयांचा निधी या शीतगृहसाठी देण्यात आला आहे. सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग डाळिंबाचे उत्पादन घेतात आणि त्यांचा जो माल होता त्याच्या साठवणुकीसाठी कोणतेही साधन तिथे प्राप्त नव्हते, त्यामुळे 2010 साली वखार महामंडळाने तेथील शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये म्हणून शीतगृह देण्यास मान्यता दिली होती. तब्बल 11 वर्षांनंतर ही मागील पूर्ण झाली आहे. यासाठी तेथील कृषी उत्पन्न समितीने 30 हजार रु. भाडे तत्वावर 20 गुंठे जागा दिली असून, तिथे हे 1800 मेट्रिक टन क्षमतेचे शितगृह उभारले आहे. यामुळे तेथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला असून, डाळिंबाबरोबर इतर शेतीमाल सुद्धा ठेवण्यासाठी त्या शितगृहाचा वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे.

हेही वाचा :
डाळिंबाच्या फुलसमस्येवर हे आहेत सेंद्रिय उपाय
डाळिंबावरील कीड व्यवस्थापन

या शितगृहात यामध्ये ० ते ४ डिग्री सेल्सिअस तापमान असणार असल्याने नाशवंत माल टिकून राहणार आहे. तसेच या शितगृहात २४ तास लाईट तसेच जनरेटर, कीटक नियंत्रण सारखी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा डाळिंब साठवण्याचा वा निर्यातीचाही मार्ग मोकळा झाला असून, नाशवंत माल आजिबात खराब होणार नाही.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा