आमिर खानने केली शेतकऱ्यांसाठी या स्पर्धेची घोषणा

0
342

अभिनेता आमिर खान यांनी सामाजिक उपक्रमामध्ये दर्जेदार काम केले असून, त्यांनी गेल्या काही वर्षात ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक उपक्रम महाराष्ट्रात राबविले आहेत. पाणी फाऊंडेशनच्या माध्यातून त्यांनी गेल्या दोन वर्षापासून वॉटर कपचे आयोजत केले होते. त्यातून राज्यातील अनेक गावात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. मध्यंतीच्या काळात त्यांनी सोयाबीनची शाळा घेतली आता आमिर खान यांनी शेतकऱ्यांसाठी नव्या स्पर्धाची घोषणा केली आहे.

महत्त्वाची बातमी : कृषी राजधानी म्हणूनही महाराष्ट्राची नवी ओळख व्हावी : राज्यपाल

एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्राला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या सत्यमेव जयते फार्मर कप नव्या स्पर्धेची घोषणा केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत सत्यजित भटकळही उपस्थित होते. यावेळी बोलताना आमिर खान म्हणाले, शेतकऱ्यांनी गट शेती यशस्वीपणे करावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, या शेतकरी गटाला तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. शिवाय त्यांच्यासमोरील समस्याही कमी होणार आहेत. आधी आम्ही पाणी जिरवले आता शिवार फुलवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य टिप्स : मे हिटपासून असा करा बचाव

शेतकऱ्यांना आणखी ज्ञानी करण्यासाठी आपल्याला काम करायचे असल्याचे सांगून आमिर खान म्हणाले, मी गावात जन्मलो असतो तर आज मी वेगळा असलो असतो. फिल्म आणि शेती याचा जवळचा संबंध आहे. शेतीमध्ये विविधता आहे. शेतकऱ्यांच्या आणि आमच्या समस्या सारख्याच आहेत. गेल्या चार वर्षात आम्ही पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेवर काम केले. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. पाणीची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात यामुळे वाढली.

महत्त्वाची बातमी : कांद्याची हिस्सार HOS-3 सुधारित जात विकसित

गेल्या चार वर्षात आम्हाला खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगून आमिर खान म्हणाले, आता केवळ पाण्यावर काम करून चालणार नाही. मृदा संवर्धन, पिक पद्धती, पाण्याचा वापर याबाबत काम करावे लागणार आहे. प्रथम आम्ही राज्यातील तीन तालुक्यात काम सुरू केले, त्यानंतर 30 आणि शेवटी 70 तालुक्यात काम केल्याचे आमिर खान यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : मे महिन्यात उन्हापासून दिलासा तर 109 टक्के पूर्व मोसमी पावसाचा अंदाज

यावेळी बोलताना सत्यजित भटकळ म्हणाले, एक पीक एक गट यावर आधारीत सत्यमेव जयते फार्मर कप ही स्पर्धा आहे. गट शेतीतील स्पर्धकांना शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या स्पर्धेत किमान 20 शेतकरी कुंटुंबाचा सहभाग असणार आहे. राज्यपातळीवर यासाठी बक्षीसे दिली जाणार आहेत. राज्यपातळीवर प्रथम येणाऱ्या शेतकरी गटाला 25 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दुसरे बक्षीस 15 लाख तर तिसरे बक्षीस 10 लाख रुपये दिले जाणार आहे. एकूण 42 रोख बक्षीसे दिली जाणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले. 

लक्षवेधी बातमी : उष्णता अजून वाढणार : स्कॉटलंडच्या हवामान शास्त्रज्ञाचा भारताला गंभीर इशारा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

👇👇👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here