महाराष्ट्रात सोयाबीन हे खरीपातील महत्त्वाचे पीक झाले असून, सोयाबीनचे क्षेत्र वरचेवर वाढत आहे. उत्पादन क्षेत्र वाढत असले तरी सोयाबीनची उत्पादकता वाढताना दिसत नाही. सध्या सोयाबीनचा उतार एकरी 5 ते 6 क्विंटल येवढाच आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकाची अशी अवस्था का ? सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी आता अमिर खानच्या पाणी फाऊंडेशनची टीम कामाला लागली आहे. त्यांनी आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन कार्याशाळा सुरू केली आहे. जे कृषी विभागाला जमले नाही ते आता पाणी फाऊंडेशन करून दाखविणार का ? असा सवाला आता उपस्थित होऊ लागला आहे.

आता प्रत्येक रविवारी ऑनलाईनच्या माध्यामातून शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीपासून ते बाजारपेठेत जाईपर्यंतचे मार्गदर्शन केले जात आहे. यासंदर्भात अभिनेते अमिर खान यांनी नुकतीच राज़्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. यावेळी सोयाबीनचे उत्पादन वाढविण्यासाठी पाणी फाऊंडेशनने तयार केलेल्या सोयाबीन उत्पादन मार्गदर्शक पुस्तकाचे ऑनलाईन लोकार्पणही कृषीमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

मागील काळात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्याकाळात महाराष्ट्रभर फिरताना पाणी फाऊंडेशनच्या टीमच्या सोयाबीन पिकाची समस्या लक्षात आली. मोठे क्षेत्र असूनही याची उत्पादकता कमी का ? या प्रश्नावर पाणी फाऊंडेशनच्या टीमने शेतकरी, कृषी विद्यापीठातील संशोधक यांच्याशी चर्चा करून एक मार्गदर्शक पुस्तीका तयार केली. यासाठी त्यांना डॉ. शरद गडाख यांचे चांगले सहकार्य लाभले आहे. या पुस्तीकेचा वापर आता सोयाबीन उत्पादन वाढीसाठी होणार आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
यशस्वी शेळीपालनासाठी छोट्या व महत्त्वाच्या 20 गोष्टी !
फलोत्पादन निर्यातीत महाराष्ट्र ‘टॉपवर’
राजापूरी हळदीच्या दरात तेजी सुरू
एचटीबीटी कापूस उत्पादनाला मिळणार लवकरच परवानगी
या कारणामुळे ढासळणार कांद्याचे दर !

सोयाबीनचे केवळ क्षेत्र वाढून चालणार नाही तर त्यासाठी सोयाबीनची उत्पादकता वाढवणे गरजेचे असल्याने पाणी फाऊंडेशनची टीम आता कामाला लागली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर रविवारी ऑनलाईनच्या माध्यमातून सोयाबीन शेतीचे धडे दिले जात आहेत. या शाळेसाठी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 255 तालुक्यातील तब्बल 46,327 हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे या सोयाबीन शाळेत गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील मराठी भाषीक शेतकरीही सहभागी झाले आहेत. येणाऱ्या काळात दुसर्या पिकावर काम करण्याची तयारी पाणी फाऊंडेशनने सुरू केली आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇