महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी विक्रीच्या नियमात काही बदल केले होते. त्यासंबंधीचे परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी जुलै 2021 मध्ये जाहीरही केले होते. त्या नुसार गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. जमीन खरेदी विक्री व्यवहारात त्रास होत होता. मात्र आता जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे. ती म्हणजे आता, काही तुकड्यांमध्ये देखील तुम्हाला जमीन खरेदी करता येणे शक्य होणार आहे.
महत्त्वाची बातमी : सेंद्रिय शेतीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करणार : कृषीमंत्री दादाजी भुसे
जमिनीच्या तुकडेबंदी संदर्भात राज्य सरकारने महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम 44 (1)(I) अन्वये काढण्यात आलेले परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरविले आहे. राज्याचे नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक (पुणे) यांनी 12 जुलै 2021 रोजी परिपत्रक काढून महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम 44 (1) (I) अन्वये सर्व जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक यांना या संदर्भात आदेश दिले होते.
न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्या. एस. जी. मेहरे यांच्या खंडपीठाने हे परिपत्रक रद्द ठरविण्यात येत असल्याचा आदेश दिला. महाराष्ट्रात धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिंबध असल्याने खरेदीखत नोंदवण्यापूर्वी मंजूर केलेला पोट विभाग किंवा रेखांकन खरेदी दस्तासोबत जोडलेला नसल्यास नोंदणीसाठी स्विकारू नये, असे आदेश दिले होते. या संदर्भात गोविंद रामलिंग सोलापूरे, प्रकाश गडगूळ व कृष्णा रावसाहेब पवार यांनी याचिका दाखल करत नोंदणी महानिरिक्षकांच्या परिपत्रकाला आव्हान दिले होते.
मान्सूनची बातमी : केरळच्या किनारपट्टीवर मान्सून 10 दिवस आधीच धडकणार
आता जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये तीन गुंठ्यांची अट असणार नाही. कारण तुकडाबंदी चे नियम औरंगाबाद खंडपीठाकडे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीखत नोंदणीचा व्यवहार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अगोदर तुकडाबंदी नियमामुळे होणारा त्रास आता संपणार असून, एक ते दोन गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणे आता शक्य होणार आहे.
औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील तुकडाबंदीचे नियम आणि परिपत्रक रद्द केल्याने आता खरेदीखत नोंदणीचा व्यवहार सुरू होण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही. राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून जमीन तुकडा बंदी नियम लागू केले होते. त्यात एन ए 44 जमीन वगळता आता सर्व प्रकारची घरे, प्लॉटची रजिस्ट्री बंद होती. तसेच जमिनीचे तुकडे करून देखील विकता येत नव्हते त्यांचीही रजिस्ट्री बंद होती.
हे नक्की वाचा : शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार रासायनिक खतांच्या साठ्याची माहिती
यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक 44 (1) (I) हा नियम ठेवला होता. त्यामुळे अशी घरे आणि जमिनीची विक्री खरेदी व्यवहार बॉण्ड पेपरवर करण्यात येत होती. त्यामुळे या विषयाच्या विरोधात काही लोकांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तुकडाबंदी मुळे होणारा जो त्रास होता तो आता कायमचा संपणार आहे.
काय होता तुकडाबंदीचा नियम ? : जमिनीचा पट्टा एक एकर असेल तर त्याचे तुकडे करून त्यातील एक ते दोन गुंठे जमीन विकता येत नव्हती, त्याची रजिस्ट्री होत नव्हती त्यामुळे जमिनीचे लेआऊट केल्यानंतरच रजिस्ट्रेशनची मुभा होती किंवा जिल्हाधिकार्यांची परवानगी घेऊन रजिस्ट्रेशन होऊ शकत होते. परंतु आता औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिल्यानंतर या त्रासापासून सुटका झाली आहे.
महत्त्वाचा निणर्य : शिल्लक उसाचे पूर्ण गाळप होणार : साखर आयुक्त
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1