जुलै महिना उजाडला तरी राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अपेक्षेपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यातील पेरण्या घटल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 4.63 टक्के पेरण्यांमध्ये घट झाली आहे. सध्या राज्यात सर्वत्र नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून व्यापला असला तरी यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा उत्याल्प पावसाची नोंद झाली आहे.
मान्सून अपडेट : जुलै महिन्यात 94 ते 106 टक्के पाऊस !
मराठवाडा वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील 30 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 259.61 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी 272.21 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरण्यांमध्ये 4.63 टक्के घट आहे.

आनंदाची बातमी : 24 तास चालणार किर्लोस्करचा नवा पॉवर टिलर
यंदा राज्यात मान्सून 11 जूनला राज्यात दाखल झाला. त्यानंतर 16 जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून मान्सूनने पुढील वाटचालीस सुरुवात केली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या तुलनेत 94 ते 106 टक्के मान्सूनचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. खरीप पिकांच्या पेरण्यांच्या दृष्टीने जुलै महिना महत्त्वपूर्ण आहे.
यंदा मराठवाड्याला वगळता इतर भागात आतापर्यंत सरासरीपेक्षा 30 ते 45 टक्के कमी पाऊस पडला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, सांगली, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला आहे. पुणे, सातारा आणि नाशिक घाट परिसरात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
ब्रेकिंग न्यूज : शेतकऱ्यांनी आडवला कृषी आयुक्तांचा ताफा
यंदा राज्यात 1 जून पासून आजपर्यंत मराठवाडा विभागात 119 मिमी (4 टक्के) पाऊस पडला आहे. कोकण विभागात 377.8 मिमी (उणे 33 टक्के) पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात 70.8 मिमी. (उणे 45 टक्के) पाऊस पडला आहे. तर विदर्भात 89 मिमी (उणे 37) टक्के पाऊस पडला आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या तुलनेत 94 ते 106 टक्के मान्सूनचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. खरीप पिकांच्या पेरण्यांच्या दृष्टीने जुलै महिना महत्त्वपूर्ण आहे.
महत्त्वाचा सल्ला : खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे : केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आवाहन

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1