सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत असून, लम्पी स्कीन रोगामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. असे असताना आता पिकावर चायनीज व्हायरस हा नवीन रोग आला आहे. या चायनीज व्हायरस रोगाने सध्या पंजाबमधील 14 जिल्ह्यांत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता लम्पी स्कीन रोगानंतर चायनीज व्हायरसची धास्ती लागली आहे.
हे नक्की वाचा : देशात यंदा अन्नधान्याचे 3 हजार 157 लाख टन उत्पादन अपेक्षित : नरेंद्र सिंह तोमर
सध्या पंजाबमधील सुमारे 14 जिल्ह्यांमध्ये धोकादायक चायना विषाणूने भात पिकाला घेरले आहे. परिस्थिती अशी आहे की शेतकर्यांना स्वतःच ट्रॅक्टर चालवून भात पीक नष्ट करावे लागत आहे. साऊथ साइड ब्लॅक स्ट्रीक्ड ड्वार्फ व्हायरस या विषाणूमुळे राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 34 हजार 374 हेक्टर क्षेत्रातील धान पीक खराब झाले आहे.
या रोगामुळे, भात पिकाची बहुतेक झाडे बौने राहतात, ज्यातून भाताचे उत्पादन घेणे जवळजवळ अशक्य होते. या चायना विषाणूमुळे शेतकरी चिंतेत आहेत, तसेच पीक निकामी झाल्याने भात उत्पादनात 4.8 टक्क्यांनी घट होऊ शकते.
मोठी घोषणा : सहकारी सोसायट्या मार्फत मध्यम व दीर्घ पतपुरवठ्याचा धोरणात्मक विचार : अमित शहा
आता पंजाबमध्ये धान पिकावर वाढणाऱ्या चायना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश शेतकरी काळजावर दगड ठेवून पिकांवर ट्रॅक्टर चालवत आहेत. कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कृषी विद्यापीठाने जारी केलेल्या पीआर 131 या प्रमाणित बियाण्यांवर चायना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. हे नुकसान खूप मोठे आहे, यामुळे भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.
ब्रेकिंग न्यूज : आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1