Onion Price Hike : सध्या देशभरात टोमॅटोचे (Tomato) भाव गगनाला भिडले आहेत. बाजारात 150 ते 200 रुपये प्रतिकिलो या दराने टोमॅटोची विक्री केली जात आहे. टोमॅटो पाठोपाठ आता कांदाही (Onion) महागणार (expensive) अशी शक्यता निर्माण झाली आहे. कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होऊ शकते, असे एका अहवालात (Report) म्हटले आहे.
ब्रेकिंग न्यूज : दरवाढीच्या नियंत्रणासाठी टोमॅटोची नेपाळमधून आयात : अर्थमंत्री सीतारामण
दरम्यान, यंदा पावसामुळे कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत कांद्याचा पुरवठा (Onion supply) कमी होण्याची शक्यता असल्याने कांद्याच्या किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यंदा कांदा लागवडीला उशिर झाला आणि उन्हाळी कांद्याला (Summer onions) अवकाळी आणि वादळी पावसाचा जोरदार फटका बसल्याने बाजारात दर्जेदार कांदा (Quality onion) कमी येण्याची शक्यता आहे. यामुळे दर्जेदार कांद्याचे दर दुप्पट होण्याची भिती केंद्र सरकारलाही वाटत आहे. यामुळे देशातील बहुतांश शहरांमध्ये कांद्याच्या किंमत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या महिन्यात कांद्याचे भाव 10 ते 15 रुपये प्रतिकिलो होते. ते आता 28 ते 32 रुपयांपर्यंत गवले आहेत. ऑगस्टअखेरीस किरकोळ बाजारात (retail market) कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरवठ्यात कमतरता असल्याने पुढील महिन्यात ही वाढ सुमारे 60 ते 70 रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, एवढी किंमत वाढल्यानंतरही या वाढलेल्या किमती 2020 च्या सर्वोच्च पातळीच्या तुलनेत खालीच राहणार आहेत.
ब्रेकिंग : कसे असतील टोमॅटोचे दर : 30 की 300 ?
अहवालात असे म्हटले आहे की, हवामानातील बदलामुळे रब्बी कांद्याचे (Rabbi onion) टिकवण क्षमता 1 ते 2 महिन्यांनी कमी झाली आहे. शिंवाय यंदा फेब्रुवारी-मार्चमध्येच कांद्याची विक्री झाल्यामुळे खुल्या बाजारात (Opan market) रब्बीच्या कांद्याचा साठा (Onion stock) सप्टेंबरऐवजी ऑगस्टच्या अखेरीस लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाजारात पुरवठ्याची कमतरता होणार आहे. परिणामी भाव वाढेच राहण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबरमध्ये नवीन कांद्याचे पीक आल्यावर भाव पुन्हा खाली येऊ शकतात. ऑक्टोबर-डिसेंबर या सणासुदीच्या महिन्यात किमतीतील चढ-उतार स्थिर राहण्याची अपेक्षा असल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते मे या काळात डाळी (Pulses), धान्य (grains) आणि इतर भाज्या (Vegetables) महागल्या होत्या, त्या काळात कांद्याच्या दराने दिलासा दिला होता.
कांद्याला चांगला भाव मिळाला नसल्यामुळे यंदा कांद्याची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे या वर्षी कांद्याच्या क्षेत्रात 8 टक्क्यांनी घट (Dicline) होणार असून, कांद्याचे खरीप (Kharip) उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घटणार आहे. वार्षिक उत्पादन 29 दशलक्ष टन (एमएमटी) अपेक्षित आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्के जास्त आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी उत्पादन कमी असूनही यंदा पुरवठ्यात मोठी तूट (Huge Supply Deficit) येण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
नक्की वाचा : 8 राज्यातील 4.09 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली \
सरकारी आकडेवारीनुसार 2020 मध्ये भारतातील कांद्याची सरासरी किरकोळ किंमत (Retail Price) 35.88 रुपये होती. ती 2021 मध्ये सरासरी किरकोळ किंमत 32.52 रुपये झाली. याचबरोबर 2022 मध्ये ती 28 रुपये प्रति किलो राहिली. मात्र आता 2023 मध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत.
असे असताना मात्र, येत्या काही महिन्यांत त्याची किंमत वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता 2023 मध्ये कांद्याचे भाव (Onion Prices) स्थिर राहिले आहेत. मात्र, येत्या काही महिन्यांत त्याची किंमत वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकार (Central Govt) 2023-24 हंगामासाठी 3 लाख टन कांदे बफर स्टॉकमध्ये ठेवणार आहे. कोणत्याही मालाच्या किमती स्थिर करण्यासाठी बफर स्टॉक (Buffer stock) ठेवला जातो. जेव्हा पुरवठा कमी असतो आणि किंमती वाढत असतात तेव्हा या स्टॉकचा उपयोग केला जातो. कांद्याच्या किमती वाढल्यास केंद्र सरकार बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणू शकते.
2021-22 मध्ये कांद्याचे उत्पादन 31.69 दशलक्ष टनांवरून 31.01 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. याबाबत भारत सरकारने (Indian Govt) एक अहवाल सादर केला होता. सरकारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून सुमारे 0.14 दशलक्ष टन कांद्याचा साठा खरेदी केला आहे.
मोठी बातमी : हळदीचे भाव महिन्यात दुप्पट : भाव आणखी वाढणार

https://www.facebook.com/shetimitramagazine03