गावपातळीवर कृषी विस्तार योजनांची कामे करताना वारंवार मागणी करूनही लॅपटॉप व डाटा शुल्क खर्च मिळत नसल्याने राज्यातील कृषी सहायक असहकार आंदोलनाच्या तयारीत असून, पहिला टप्पा म्हणून कृषी सहायक संघटनेच्या वतीने सोमवारी, दि. 8 ऑगस्ट रोजी राज्यभर धरणे आंदोलन केले जाणार आहे.
मोठी बातमी : कांदा उत्पादक आक्रमक : 16 ऑगस्टपासून कांदा विक्री बंदचा इशारा
प्रशासनाचे लक्षवेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने पाच टप्प्यात आंदोलनाचा दीर्घ कार्यक्रम हाती घेतला असून, निषेध म्हणून 15 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व कृषी सहायक कार्यालयीन व्हाटस्अप समुहातून बाहेर पडणार आहेत. तर अंतिम टप्प्यात 15 सप्टेंबरपासून ‘महाडीबीटी’ची सर्व ऑनलाइन कामे बेमुदत बंद ठेवली जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
हे नक्की वाचा : भविष्यात ग्रीन हायड्रोजन हेच इंधन : गडकरी
दरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना ही समस्या सांगितली आहे. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त होऊन हा आंदोलनाचा पावित्रा घेण्याची वेळ आली आहे.
खऱ्या अर्थाने गावपातळीवर काम करणाऱ्या आणि कृषी विभागाचा कणा असलेल्या कृषी सहायक कसल्याच सेवासुविधा दिल्या जात नसल्याने, त्याला काम करतान अनेक अडचणी येतात. कारण कृषी विभागाची सर्व कामे आता ऑनलाइन करण्यात आली आहेत. कृषी विभागाची मुख्य कामे कृषी सहायक करीत आहेत. मात्र कृषी सहायकांना साधा भ्रमणध्वनी व्यवस्थापन खर्च तसेच डाटा शुल्क दिले जात नाही. या खर्चापोटी दीड हजार रुपये तसेच ऑनलाइन कामासाठी लॅपटॉप मंजूर करण्याची अनेक दिवसाची मागणी रखडविण्यात आलेली आहे.
ब्रेकिंग न्यूज : उसाला प्रतिटन 3050 रुपये एफआरपी जाहीर
दरम्यान, ऑनलाइन कामाच्या साधनसामुग्री समस्येबाबत येत्या शुक्रवारी कृषी संचालकांसोबत बैठक होणार असून, या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने दिला आहे.
ब्रेकिंग न्यूज : केंद्र सरकार ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याच्या तयारीत
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1