Agriculture Department : राज्यपालांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावा  

0
362

राज्य व केंद्राच्या कृषी योजनांचा राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ व्हावा, या उद्देशाने राज्यपाल रमेश बैस यांनी एका उच्च स्तरीय बैठकी घेऊन राज्यातील कृषी विभागाच्या विविध केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांचा राजभवन येथे आढावा घेतला.

मान्सून अपडेट्स : पुन्हा पुढील पाच दिवस पाऊस !  

यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, कृषी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हा कणा बळकट राहण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम केले पाहिजे. कृषी योजनांचा राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ व्हावा या दृष्टीने अर्थसंकल्पीय निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्णपणे खर्चित होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

कृषी विकासासंदर्भात काही धोरणात्मक अडचणी असल्यास आपण त्याबाबत शासनाशी चर्चा करु, असे सांगून राज्यपाल बैस म्हणाले, कृषी योजनांचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचत आहे किंवा नाही हे पहाणे गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले, फलोत्पादन विकासासंदर्भात आपण स्वतंत्रपणे आढावा घेऊ.

मोठी घोषणा : दोन महिन्यात केळी विकास महामंडळ स्थापन करणार : भुमरे

यावेळी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार यांनी 2023 – 24 या वर्षाकरिता कृषी क्षेत्रातील शासनाच्या उद्दिष्टांची तसेच 2023 – 24 वर्षाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदी व नव्या उपक्रमांची माहिती दिली.

राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह, ‘स्मार्ट प्रकल्प’ संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी देखील यावेळी सादरीकरण केले व आपापल्या विभागांच्या कामाची माहिती दिली.

लम्पी आजार : पशुपालकांना अशी मदत मिळणार : राधाकृष्ण विखे -पाटील

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here