कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत भारत आणि जागतील इतर अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम झाला मात्र शेती क्षेत्रावर कमी परिणाम झाला. शेती क्षेत्र अर्थव्यवस्थेला सलग दुसर्या वर्षी तारणार असून, यंदाही शेतीचा विकासदर 3 टक्क्यांपेक्षा अधिक राहील, असा अंदाज निती आयोगाने व्यक्त केला आहे.
कोरोना संसर्गामुळे जवळजवळ सर्वच क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. मात्र कोरोनाच्या संकटकाळात भारतीय अर्थव्यवस्थेला संभाळण्याचे काम शेती क्षेत्राने केले आहे. देशातील शेतकर्यांनी अर्थव्यवस्या सांभाळून ठेवली आहे. कोरोना महामारिच्या दुसर्या लाटेचा शेती क्षेत्रावर कमी परिणाम जाणवेल, असे निती आयोगावरील शेती क्षेत्राचे प्रतिनिधी रमेश चंद यांनी म्हटले आहे.
निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी भारतीय शेतीच्या विकासदराबाबत बोलताना सांगितले की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात शेतीचा विकासदर ३ टक्क्यांपेक्षा अधिक राहील. गेल्या आर्थिक वर्षात शेतीचा विकासदर 3.6 टक्के राहिला आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी घसरली होती, असे सांगितले.
यासंदर्भात पीटीआयशी बोलताना ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या दुसर्या लाटेत शेती क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे सांगून ते म्हणाले, ग्रामीण भागात कोरोना मे महिन्यात वाढला मात्र मे महिन्यात शेतीतील कामे कमी प्रमाणात सुरू असतात. त्यामुळे शेती क्षेत्रावर याचा कमी परिणाम जावणार आहे. भारतात प्रामुख्याने अनुदान, दर आणि तंत्रज्ञान हे तांदुळ, गहू आणि ऊस या पिकांवर आधारीत आहे. मात्र यापुढे भारतीय शेतचा तेलबिया उत्पादनासंबंधी विचार झाला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा