राज्याच्या कृषीमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्तार यांनी कृषी हा माझा आवडता विषय आहे. कृषी विभागात अनमोल असे बदल करून शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी विशेष योजना केंद्र आणि राज्यसरकारच्या मदतीने राबवणार असल्याची हमी शेतकऱ्यांना दिली आहे.
लक्षवेधी बातमी : नांदेड येथे शेतकरी आक्रमक : लक्षवेधी मोर्चे
अब्दुल सत्तार म्हणाले की, माझे प्रमोशन झाले आहे. कृषीप्रधान महाराष्ट्र राज्याची कृषी विभागाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर सोपवली आहे. कृषीमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी आभार मानतो. दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पडेन. कृषी विभागात अनमोल असे बदल करून शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी विशेष योजना केंद्र आणि राज्यसरकारच्या मदतीने राबवणार असल्याचं सत्तार यांनी म्हटले

मी कोणतीही मागणी न करता मला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मागील ४२ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली. कृषी खाते हा माझा आवडता विषय आहे. आपण शेतकरीप्रश्नी वारंवार लढा दिल्याचे सत्तार यांनी यावेळी सांगितले.
आनंदाची बातमी : वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार जाहीर
दरम्यान, कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळताच अब्दुल सत्तारांनी तात्काळ मराठवाडा विभागाची बैठक जालना येथे बोलावली आहे. जुलै महिन्यात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा सत्तार घेणार आहेत. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात तब्बल 4 लाख 43 हजार 70 हेक्टरवरील पिकांचे नुकसान आजवर झाले आहे. तर मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी अंदाजे 750 कोटी रुपये लागणार आहे. विभागीय प्रशासनाने 310 कोटींच्या नुकसानीचा अहवाल 31 जुलै रोजी मुख्यमंत्री शिंदे यांना सादर केला होता.
कृषी ही राज्याच्या मंत्रीमंडळातील अत्यंत महत्वाचे खाते आहे. शेतकऱ्यांशी निगडीत या खात्याला सत्तार किती न्याय देतात, विशेषतः पीक विमा, अतिवृष्टी, पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळवून देण्यात कृषीमंत्री म्हणून सत्तार यांना किती यश मिळते ? हे पाहणे महत्वाचे आहे.
महत्त्वाच्या टिप्स : आडसाली उसाच्या जोमदार वाढीसाठी लागवड तंत्रज्ञान

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1