Agri Crop Insurance : मी शेतकऱ्याचा मुलगा (Farmer’s Son) आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या वेदना (Farmer’s pain) चांगल्या कळतात, दिवाळीपूर्वी (Before Diwali) शेतकऱ्यांना 25 टक्के आगरी पीक विम्याची (Agri Crop Insurance) रक्कम देण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे. जर दिवाळीच्यापूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झाली तर मी देखील दिवाळी (Diwali) साजरी करणार नाही, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री (Agriculture Minister) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले.
मोठी बातमी : 86032 उसाच्या वाणाला आता 15012 नवा पर्याय
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये (Beed) कृषी विभागाच्या (agriculture department) विविध योजनेतील (various schemes) लाभार्थ्यांना (Beneficiaries) ट्रॅक्टरचे (Tractors) वाटप (Allotment) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बीडमध्ये 40 लाभार्थ्यांना धनंजय मुंडे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.
मी शेतकऱ्याचा मुलगा (Farmer’s Son) आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या वेदना (Farmer’s pain) चांगल्या कळतात असा विरोधकांना टोला लगावत कृषीमंत्री मुंडे म्हणाले, पिक विम्याच्या बाबतीत विरोधक (Opposition) मोठ मोठ्या सभा (meetings) घेतील अफवा (Rumors) पसरवतील. मात्र, त्यांच्यावर विश्वास (Beliefs) ठेवू नका. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा (Farmer’s Son) आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना (Farmer’s pain) मला चांगल्या कळतात, असे ते म्हणाले.
महत्त्वाची बातमी : बिकानेरच्या केंद्रीय कोरडवाहू फळ संशोधन केंद्राकडून डॉ. नवनाथ कसपटे यांची दखल
बदलते हवामान (Climate Change) आणि पावसाचे प्रमाण (Rainfall) लक्षात घेता शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेतीकडे (Modern Farm) वळले पाहिजे असा सल्ला देवून ते म्हणाले. याबरोबरच यापुढे, यांत्रिक शेती देखील प्राधान्याने केली पाहिजे. शेतीच्या यांत्रिकीकरणाला (Mechanization) आपण अधिक पाठबळ देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे, त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या (Insurance Company) नियमानुसार पीक लागवडीपासून 21 ते 25 दिवस पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के आगरी पिक विमा (Crop Insurance) रक्कम देण्यात येते. म्हणजे ज्या मंडळामध्ये 21 ते 25 दिवस पाऊस पडलेला नाही त्यांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, दिवाळीच्या पूर्वी (Before Diwali) सर्व शेतकऱ्यांना आगरी पीक विम्याची रक्कम (Crop Insurance Amount) देण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करत असल्याचे मुंडे म्हणाले.
हेही वाचा : शेतीच्या दृष्टीने हे आहे ; घटस्थापनेचे महत्त्व
https://www.facebook.com/shetimitramagazine03