यंदा पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. जूनपासून सुरु झालेला पाऊस अजून मुक्कमी आहे. या अतिरिक्त पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, खरी हंगाम गेला आता रब्बीही जातो की काय ? अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. यंदा राज्यसह देशभरात डिसेंबरपर्यंत पाऊस पडणार असा हवामान तज्ज्ञांकडून पावसाचा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान बदलाचा परीणाम असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाची माहिती : गोमुत्राचे हे आहेत ४४ फायदे
यंदा देशाच्या विविध भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण होणार आहेत. त्यामुळे यंदा राज्यसह देशभरात डिसेंबरपर्यंत पाऊस पडणार आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. दक्षिण आशियाई हवामान परिषदेत हवामान तज्ज्ञांकडून डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जर यंदा डिसेंबरपर्यंत पाऊस झाला तर त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. प्रमुख्याने कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर ही पिके सकंटात सापडणार आहेत. तसेच गहू आणि ढगाळ वातावणामुळे हरभारा या पिकांना देखील कमी अधिक प्रमाणात फटका बसू शकतो. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी : यंदा दिवाळीत गुलाबी थंडीबरोबर पाऊसही !
दरम्यान यंदा यापूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच काही भागात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले, पिके खराब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. या संकाटातून सावरल्यानंतर पुन्हा एकदा काही दिवसांपासून राज्यत पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा फटका हा सोयाबीन आणि कापूस या पिकाला सर्वाधिक बसला आहे.
आता यंदा डिसेंबरपर्यंत राज्यासह देशात पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मोठी बातमी : सिल्लोडमध्ये कृषी औद्योगिक पार्क उभारणार : उद्योगमंत्री सामंत
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1