राज्यात सध्या उन्हाचा जोर वाढतच चालला असून, तापमानामुळे लोक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासत आहे. तसेच पिकांनाही पाण्याची गरज निर्माण झाली आहे. मे महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाच्या तिव्रतेने अहाकार माजवला आहे. अशातच पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातला तापमानाचा पारा 45 अंशावर जाणार असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे.
गेल्या दोन तीन वर्षापासून उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ होत आहे. याची कारण मिमांसा करताना ग्लोबल वार्मिंग, हवामानतील बदल, कार्बन उत्सर्जन अशी कारणे सांगितली जातात. यंदा त्याची खरी प्रचिती दिसून आली आहे. यंदा महाराष्ट्रातील अनेक शहरातील तापमान 44 अंशाच्या पुढे गेले आहे. पुर्वी महाराष्ट्रातील ठरावीक नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात तापमानाचा पारा वर असायचा मात्र यंदा सोलापूर, जळगाव, नाशिक आणि ठाणे याशहरातील तापमानात कमालीची वाढ झालेली दिसून आली. प्रत्येक वर्षी तापमानाचा पारा एक ते दोन अंशाने वाढताना दिसत आहे.
लक्षवेधी बातमी : मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली या तीन शेतकऱ्यांनी कृषी पुरस्काराची रक्कम
सध्या राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली असताना अशातच पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तरेकडून उष्णतेच्या लहरी सक्रीय झाल्याने राज्यातला तापमानाचा पारा 45 अंशावर जाणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागानं इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांनाही या उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार आहे. तर दुसीरीकडे कोकणात ढगाळ वातावरण झाले आहे. तसेच गोव्यात देखील किंचीत ढगाळ वातावरण झाले आहे.
महत्त्वाची बातमी : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ; काय होणार परिणाम ?
उद्या (10 एप्रिल) धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नाशिकात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात 12 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान अधिक असणार आहे. तिथे उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. काही ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नागपुरात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेमुळे तापमान 45 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 11 आणि 12 मे रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान विभागाने सांगितली आहे.
महत्त्वाची बातमी : आता उसापासून तयार होणार जाम !
देशात एकीकडे तापमान वाढत असताना पश्चिम बंगालमध्ये असनी चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. असनी चक्रीवादळ पुढील 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे चक्रीवादळ आता विशाखापट्टणमपासून 940 किमी आणि ओडिशातील पुरीपासून 1000 किमी अंतरावर असल्याचे माहिती मिळत आहे. हे चक्रीवादळ 10 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता असल्याने बंगालमध्ये ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप याचा काही परिणाम झाला नसून, राज्यात उन्हाचा चटका जाणवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता मे महिन्यात ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1