आवळ्याचे आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्व वाढत आहे. मुख्यत: आवळा शेती ही मुल्यवर्धनाच्या दृष्टीने अतिशय उत्तम शेती आहे. मात्र त्यासाठी त्यापासून तयार होणार्या प्रक्रियायुक्त पदार्थाची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. प्रक्रीया करण्यासाठी कोणत्या जातींचा आवळा लागतो. आवळ्यामध्ये कोणत्या जाती आहेत. त्याची गुणवैशिष्ट्ये काय याची माहिती असणे गरजेचे असते.

आवळ्याचे झाड अत्यंत काटक असल्यामुळे या फळाची फारशी काळजी न घेता येईल या फळे झाडापासून चांगले उत्पादन मिळते. आवळ्यापासून कमी खर्चात मिळणारे उत्पादन, आहार दृष्ट्या महत्त्व आणि औषधी उपयुक्तता यामुळे आवळा या फळपिकाच्या लागवडीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
बंपर उत्पादन देणाऱ्या जाती
बनारसी : उत्तर प्रदेशात बनारसी जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या जातीची फळे आकाराने मोठी असून चकचकीत, पिवळसर रंगाचे असतात. या जातीच्या फळांचे वजन 40 ते 45 ग्रॅम असते.या जातीची फळे मुरब्बा आणि लोणच्यासाठी उत्तम समजली जातात.या जातीच्या फळांचा 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 650 मिलिग्रॅम क जीवनसत्व असते.
कृष्णा (एन. ए.-5) : या जातीची फळे मध्यम ते मोठ्या आकाराचे,मऊ सालीची, चमकदार,पिवळसर रंगाची, लाल छटा असलेले असतात. या जातीच्या फळाचे वजन 35 ते 40 ग्रॅम असते. मुरब्बा सारखे टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी ही जात उत्तम आहे. या जातीच्या फळात साखरेचे प्रमाण 11.5 टक्के आणि आम्लता 1.4 टक्के असते.
चकिया : ही जात उशिरा तयार होणाऱ्या असून नियमित आणि भरपूर उत्पादन देणारी आहे.या जातीची फळे मध्यम आकाराचे,चपटी आणि रंगाने हिरवट असतात.फळांचे वजन 30 ते 32 ग्रॅम असते. लोणच्यासाठी आणि तर टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी ही जात उत्तम असून नेक्रोसिस या रोगास ही जात बळी पडत नाही. या जातीत फळगळ होत नाही. म्हणून आवळ्याच्या व्यापारी उत्पादनासाठीया जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
कांचन (एन.ए.-4) : ही जात भरपूर उत्पन्न देणारी असून या जातीची फळे मध्यम आकाराची आणि पिवळसर रंगाचे असतात. या जातीच्या फळांचे वजन तीस-बत्तीस ग्रॅम असते. फळांमध्ये साखरेचे प्रमाण दहा टक्के आम्लता 1.45 टक्के असते. ही जात त्रिफळा चूर्ण आणि लोणच्यासाठी उत्तम आहे.
हेही वाचा :
शिकूण घ्या ! आवळा लागवडीचे उत्पादन तंत्रज्ञान
अंजीर उत्पादनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन !
चिकू लागवडीचे कसे असते परफेक्ट व्यवस्थापन
डाळिंबाच्या फुलसमस्येवर हे आहेत सेंद्रिय उपाय
पपई बागेतील रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना
नरेंद्र आवळा-7 : ही जात फ्रान्सिस आवळ्याच्या जातीपासूनसंशोधित केलेली आहे.ही झाडे सरळ वाढतात. नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये फळे तयार होतात.फळे मोठ्या आकाराचे असतात. फळाचे वजन 40 ते 50 ग्रॅम असते.फळांचा आकार लंबगोल आकार असतो. पृष्ठभाग चमकदार, फिक्कट पिवळ्या रंगाचा असतो.गरात रेषा अजिबात नसतात. ही जात सुद्धा फ्रान्सिस जाती प्रमाणे नेक्रोसिस रोगास बळी पडत नाही.
आनंद-1 : या जातीचे झाड मध्यम उंचीचे असते.फांदया पसरणाऱ्या असतात. खोडाची साल पांढरी असते. फळे मोठी गोल,सफेद रंगाची, रेषा हिन,गुलाबी छटा असलेली पारदर्शक असतात. फळाचे वजन 35 ग्रॅम असून जीवनसत्व क 770 मिलीग्रामप्रति 100 ग्रॅम असते. बी लहान असते तसेच उत्पादन शक्ती चांगली असते.प्रत्येक झाडास 75 ते 80 किलो फळे येतात.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा