लोकअंदोलनामुळे देश नव्हे तर जागतीक पातळीवर नेहमीच चर्चेत राहणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण, अण्णा हजारे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरुद्ध नारा देण्याच्या तयारीत दिसत आहेत. यासाठी त्यांनी ‘नॅशनल पीपल्स मूव्हमेंट’ ( NPM ) ही नवी संघटना स्थापन केली असून, याची अधिकृत घोषणा ते 19 जून रोजी दिल्लीत करणार आहेत.
ब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळ्याचा समावेश

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यापूर्वी दिल्लीत केलेले आंदोलन मोठे गाजले होते, तसेच या आंदोलनाला देशभरातून पाठिंबाही मिळाला होता. अण्णा हजारे 19 जून रोजी दिल्लीत येत आहेत, जिथे ते त्यांच्या नवीन संघटनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अण्णा हजारे यांनी कोणताही राजकीय पक्ष स्थापन केलेला नाही आणि आजपर्यंत कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंध ठेवलेला नाही. यापूर्वी त्यांनी कोणत्याही प्रकारची संघटना स्थापन केली नव्हती, पहिल्यांदाच त्यांनी राष्ट्रीय लोकआंदोलन संघटना स्थापन केली असल्याचे त्यांचे सहकारी भोपाल सिंह यांनी सांगितले.
महत्त्वाची बातमी : थांबा, पेरणीची घाई करु नका : कृषीमंत्री दादा भुसे यांचा सल्ला
अण्णा हजारे हे समाजसेवक आहेत हे लोक विसरतात असे सांगून ते म्हणाले, या लोकआंदोलन या संघटणेच्या माध्यमातून ते भ्रष्टाचाराविरोधात काम करणार आहेत. तसेच राष्ट्रीय लोक आंदोलन संघटनेचे अध्यक्ष अण्णा हजारे आहेत. देशाला ज्यावेळी अण्णा हजारेंची गरज असेल, तेव्हा अण्णा हजारे घरातून बाहेर पडतील, असेही भोपाल सिंह यांनी म्हटले आहे. ही एकमेव सामाजिक संघटना आहे; ज्यात देशभरातील सामाजिक संघटना अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आनंदाची बातमी : आता रेशन दुकानातही मिळणार भाजीपाला आणि फळे

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1