पीएम किसान योजनेचा निधी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसी करण्यासाठी मार्चपासून तब्बल तीनवेळा मुदतवाढ देऊनही 100 टक्के ई-केवायसी झाली नसल्याने पुन्हा चौथ्यांदा 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मोठी बातमी : नवीन कापसाला मिळाला चक्क एवढा भाव ?
यामुळे आता शेतकऱ्यांना ई-केवयसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल एक महिना मिळाला आहे. ई-केवायसी प्रमाणीकरण आणि पोर्टलवर डाटा अपलोड करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही एक महिन्याची मुदतवाढ केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग न नोंदवल्यामुळे पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला आहे.

पीएम किसान योजनेचा निधी पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून ती बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेसाठी जे शेतकरी पात्र नाहीत ते देखील योजनेचा लाभ घेत आहेत. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्याने. संपूर्ण देशात ई-केवायसी करण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याने, मार्च 2022 पासून आजपर्यंत चार वेळा मुदतवाढ करावी लागली आहे.
महत्त्वाच्या टिप्स : नारळाच्या व्यापारी शेतीसाठी ‘या’ आहेत महत्त्वाच्या 10 जाती !
ई-केवायसी बाबत शेतकऱ्यांनी गांभीर्यांने घेतले नसले तरी केंद्र सरकारने कायम शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना या योजनेचा 12 वा हप्ता मिळणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये अदा केले जात. तीन हप्त्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रियाच पूर्ण केली नाही. त्यामुळे निम्म्याहून अधिक शेतकरी हे या योजनेपासून वंचित राहिले असते, त्यामुळे सलग चौथ्यावेळेस ही मुदतवाढ करण्यात आली आहे.
मोठी घोषणा : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वंकष धोरण निर्माण करणार : कृषीमंत्री अब्दुल सत्तार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1