राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे. या कांदा अनुदानासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार असून त्याचा कालावधीत निश्चित करण्यात आला आहे.
हे नक्की वाचा : फायद्याची मोत्यांची शेती
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कांद्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपये प्रतिक्विंटलच्या मर्यादेपर्यंत कांद्यासाठी हे अनुदान मिळणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांत खाजगी बाजारात थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे किंवा नाफेडकडे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या काळात कांद्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान 200 रुपयांच्या मर्यादेत मिळणार आहे.
कांद्याच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी विहित मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कांद्याचे 350 रुपयांची अनुदान मिळण्यासाठी 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या टिप्स : जिवामृताचे हे आहेत सर्वोत्तम 6 फायदे
अर्जासोबत विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा, बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स ही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1