गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची वर्णी लागली आहे. मागील चेअरमन विश्वासराव पाटील यांनी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गोकुळ शिरगावमधील गोकुळच्या कार्यालयामध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ब्रेकिंग न्यूज : लातूर जिल्ह्यात जनावरांना पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव
अरुण डोंगळे हे गोकुळचे दुसऱ्यांदा चेअरमन झाले असून, यापूर्वी 2010 ते 2013 या कालावधीत त्यांच्याकडे संघाच्या अध्यक्षपडची धुरा होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोकूळच्या निवडणुकीत माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने महादेवराव पाटील यांची अनेक वर्षांची सत्ता उलथवून टाकली होती. त्यानंतर सत्ताधारीकडून विश्वासराव पाटील यांना चेअरमनपदाची संधी दिली होती. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा मागील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आज झालेल्या चेअरमन निवडीत अरुण डोंगळे यांची निवड करण्यात आली.
शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनंतर दूध संघाची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. यावर गोकूळच्या संचालक मंडळात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावत लेखापरीक्षणाचा अहवाल 8 जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश आदेश दिले. सध्या दूध संघाचे लेखापरीक्षण सुरू आहे. त्यामुळे नवीन चेअरमन अशोक डोंगळे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
आनंदाची बातमी : 14 ऑगस्टला लातूरमध्ये सोयाबीन परिषद : कृषीमंत्री सत्तार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1