विदर्भात शुक्रवारनंतर काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार दणका दिला. या अवकाळी पावसाने विदर्भातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्या अंती विदर्भातील 11 जिल्ह्यात 8100 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मोठी बातमी : यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस
राज्यात शुक्रवारी विविध भागात वादळी वारा, गारपीट व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या पावसाने विदर्भातही चांगलाच धुमाकूळ घातला. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अचानकपणे वादळी वारा, गारपीट व पाऊस झाला. यामुळे अनेक भागात कापणी केलेल्या गव्हाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. अमरावती जिल्ह्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात घेतल्या जाणार्या संत्रा पिकावर या पावसाचा मोठा परिणाम झाला. बहुतांश भागातील संत्रा बागांमधील फळे गारपिटीमुळे डागाळली आहेत. या फळांवर थोड्याच दिवसात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. शिवाय बहुतांश संत्राबागांमध्ये फळगळ होण्याचा धोका वाढला आहे.
चिंताजनक : स्कायमेटकडून मान्सूनचा चिंताजनक अंदाज
या अवकाळी पावसामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 8,036.27 हेक्टरवर नुकसान नोंदविण्यात आले आहे तर नागपूर विभागातील पाच जिल्ह्यात केवळ 188 हेक्टर नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.

अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 5,859 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात 1,174 हेक्टर, अमरावती जिल्ह्यात 961.02 हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात 23.70 तर वाशीम जिल्ह्यात सर्वात कमी 18.48 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या अहवालात करण्यात आली आहे.
मोठी बातमी : अवकाळी पावसाचा पुन्हा तडाका : नाशिक भागातील द्राक्षबागा भुईसपाट
अमरावती विभागात नुकसान झालेल्या पाच जिल्ह्यातील 17 तालुके बाधीत झाले असून त्यामध्ये सर्वसाधारण बाधित झालेल्या गावांची संख्या 352 आहे. या गावांमध्ये कांदा, मका, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा अशा पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

नागपूर विभागात या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम दिसून आलेला नाही. या विभागातील सहा जिल्ह्यापैकी गोंदिया व नागपूर या जिल्ह्यात सर्वाधिक पिकाचे नुकसान झाले आहे. या विभागात 188 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून, बाधीत गावांची संध्या 139 आहे. या बाधित गावांमध्ये संत्र्यासह गहू, हरभरा या पिकाचे नुकसान झाले आहे.
चिंताजनक : मराठवाड्यात 9 ठिकाणी वीज कोसळून 5 जणांचा बळी : 31 जनावरे दगावली

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1